आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतयोजने अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी केले इ-भूमिपूजन, नियोजनाचा अभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-अमृतयोजने अंतर्गत अकोला पाणी पुरवठा योजनेच्या सबलीकरणासाठी ८७ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून १३ एप्रिल रोजी वर्षा बंगल्यातून करण्यात आले. हे भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे अकोलेकरांनी पाहिले. ८७ कोटी रुपयाच्या कामाला लगेच प्रारंभ होणार आहे. 
 
अमृत योजने अंतर्गत महापालिका क्षेत्रात विविध विकास कामांसाठी केंद्र, राज्य शासनाकडून महापालिकेला कोट्यवधी रुपयाचा निधी मिळणार आहे. अमृत योजनेत पहिल्या टप्प्यात पाणी पुरवठ्याला प्राधान्य देण्यात आले आहे. अकोला महापालिका क्षेत्राला काटेपूर्णा प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. १९९८ ला ही योजना कार्यान्वित झाली. परंतु महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती मात्र करता आलेली नाही. त्यामुळे केवळ १३ जलकुंभाच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. तर अनेक भागातील जलवाहिन्या क्षतीग्रस्त झाल्याने यातून पाण्याची गळती होत राहते. 

हद्दवाढी पूर्वीच्या महापालिका क्षेत्रात अद्यापही काही भागात जलवाहिन्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या सर्व बाबी लक्षात घेऊनच अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठ्याची विविध कामे प्रस्तावित करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ११० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यातून कोटी रुपये सोलर पॉवर प्लॉन्टसाठी खर्च केले जाणार आहेत. अकोला पाणी पुरवठा योजनेसह राज्यातील एकुण २८ गावांमधील विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन वर्षा बंगल्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले. यावेळी महापौर विजय अग्रवाल, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधिर सावरकर, आमदार गोपिकिशन बाजोरीया,उपमहापौर वैशाली शेळके, भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, डॉ.किशोर मालोकार, दीपक मायी, गटनेते राहुल देशमुख, राजेश मिश्रा, शितल गायकवाड तसेच उपायुक्त समाधान सोळंके, सुरेश सोळसे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे उपस्थित होते.
 
 नियोजनाचा अभाव 
एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यासह २८ गावांमधील विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन केले. या सर्व गावांमध्ये या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच व्हिडीओ कॉन्फरसींगच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांशी संवाद साधला. अकोल्यात या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन भवनात करण्यात आले होते. तर व्हिडीओ कॉन्फरसींगची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनाही बोलावण्यात आले नाही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्स रुम मध्ये प्रमुख पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था केली गेली नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...