आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनात सहभागी व्हा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विविध कारणांमुळे नदी, नाले प्रदुषणयुक्त झाले आहे. यात गणेश मूर्ती विसर्जनाचाही समावेश आहे. गणेश मूर्तींसह निर्माल्य थेट नदीत विसर्जित केले जाते. त्यामुळे पाणी प्रदुषित होते. यासाठी संस्कृती पर्यावरण पूरक गणेश विसर्जन घाट महापालिका प्रशासनाच्या वतीने मोर्णा नदी काठावर सुरू केले आहेत. परंतु एक गणेश घाट वगळता इतर ठिकाणी मात्र थेट मूर्तीचे विसर्जन नदीत केले जाते. ही बाब लक्षात घेऊनच दिव्य मराठी, उपमहापौर विनोद मापारी मित्र परिवार आणि अजय गावंडे मित्र परिवाराच्या वतीने ईको-फ्रेंडली गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशभक्तांनी थेट नदीत गणपती मूर्तीचे विसर्जन करता या अभियानात सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विक्रीवर बंदी आणली असली तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. तर दुसरीकडे मातीच्या मूर्तीही उपलब्ध नाहीत. यासाठीच “दिव्य मराठी’ आणि उपमहापौर विनोद मापारी मित्र परिवाराच्या वतीने रिंगरोड भागात ईको-फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत शेकडो विद्यार्थी आणि युवक सहभागी झाले होते. याचबरोबर शहराच्या अनेक भागात शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. आता गणपती विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. ईको-फ्रेंडली गणपतीची स्थापना केल्यानंतर या गणपती बाप्पाचे विसर्जनही ईको-फ्रेंडली पद्धतीने पर्यावरणाला नुकसान करता करणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच “दिव्य मराठी’ने पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाचे आवाहन केले आहे. उपमहापौर विनोद मापारी मित्र परिवाराच्या वतीने १५ सप्टेंबरला रवीनगर, रिंगरोड भागातील शिव उद्यानात ईको-फ्रेंडली गणेश विसर्जन घाटाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिव उद्यान परिसरात ते फुटाचे आठ ते दहा कुंड, एक निर्माल्य कुंड तयार केले जाणार असून आरती पूजेची व्यवस्थाही केली जाणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सातपर्यंत गोरक्षण रोड, मंगरुळपीर रोड, मलकापूर, खडकी आदी भागातील गणेशभक्तांना या ईको-फ्रेंडली गणपती विसर्जनाचा लाभ घेता येणार आहे. सायंकाळी सहा वाजता महाआरतीचे आयोजन केले आहे. विनोद मापारी मित्र परिवारातील कार्यकर्ते तसेच अमृत कलश विद्यालयाचे विद्यार्थी या उपक्रमाला मदत उर्वरित.पान
करणार आहेत.

यासोबतच अजय गावंडे मित्र मंडळाच्या वतीने १५ सप्टेंबरला आदर्श कॉलनी उद्यानात ईको-फ्रेंडली गणपती विसर्जनाची व्यवस्था केली जाणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत या ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून, गणेश विसर्जनासाठी एक भला मोठा हौद तयार केला आहे. यात गंगा नदीसह विविध नद्यांचे जल टाकले जाणार आहे. त्याचबरोबर निर्माल्य टाकण्यासाठी वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच गणेशभक्तांना महाप्रसादाचेही वाटप केले जाणार आहे. गणेशभक्तांनी दोनपैकी एका ठिकाणी पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

घरच्या घरीच करा विसर्जन
अनेक गणेशभक्तांना गणपती विसर्जन पर्यावरणपूरक करावेसे वाटते. मात्र वेळेअभावी शक्य होत नाही. परिणामी अनेक गणेशभक्त नदीमध्ये गणेश विसर्जन करतात. परंतु आपल्या गणपती मूर्तीचे आपल्याला घरच्या घरीच विसर्जन करता येणे शक्य आहे. एका मोठ्या बादलीत शाडूच्या मातीच्या गणपतीचे विसर्जन करून विसर्जन केलेल्या मूर्तीची माती अंगणात किंवा कुंडीत टाकून तुळशीचे रोपही लावता येते, अशी माहिती पर्यावरणप्रेमींनी दिली.
बातम्या आणखी आहेत...