आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी अनेकांचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पर्यावरण पूरकगणेशोत्सव साजरा व्हावा, यादृष्टीने विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मातीच्या गणेशमूर्तीच्या स्थापनेपासून तर विसर्जनही पर्यावरणपूरक व्हावे या उद्देशाने उपक्रम राबवले जात आहेत. दैनिक दिव्य मराठीने सुरू केलेल्या ईको फ्रेंडली गणेश विसर्जनाची व्यवस्था या महाअभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महापौरांसह अनेक मंडळांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात महापौर उज्वला देशमुख, श्री रेणुका माता मित्र मंडळ, समाजसेवा बिछायत केंद्र, लोकमान्य गणेशोत्सव मंडळ, शिवराय बाल गणेशोत्सव मंडळ या मंडळांनीही सहभाग नोंदवत पर्यावरणपूरक विसर्जनाची व्यवस्था केली आहे.
या अभियानाला प्रतिसाद देत डाबकीरोड येथील श्री रेणुका माता मित्र मंडळ आणि समाजसेवा बिछायत केंद्र यांनी संयुक्तपणे क्रांती चौक येथे छाया हॉस्पिटलजवळ ईको फ्रेंडली गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. येथे सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यंत नागरिकांना घरातील लहान मूर्तींचे विसर्जन करता येईल. येथे गणरायाच्या आरतीसाठी वेगळी व्यवस्था असून, निर्माल्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था केली आहे. जुने शहरातील नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याचे आवाहन मंडळाचे नितीन देशमुख मुकूंद गिरी यांनी केले आहे.

गड्डम प्लॉट येथील लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बिर्ला रोड येथील प्रकाश किराणा दुकानाजवळ ईको फ्रेंडली गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथेही सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यंत नागरिकांना गणेश विसर्जन करता येईल. शिवाय निर्माल्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी सहभागी होऊन बाप्पाला पर्यावरणपूरक पद्धतीनेच निरोप देण्याचे आवाहन देवानंद टाले यांनी केले आहे. महापौर उज्वला देशमुख यांच्या वतीने शिवाजी उद्यानात ईको फ्रेंडली विसर्जनाची व्यवस्था केली असून, तेथे सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत विसर्जन करता येणार आहे. शिवाय येथेही निर्माल्याची वेगळी व्यवस्था केली आहे. यासोबतच शिवराय बाल गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रेणुकानगर येथील काळ्या पाण्याच्या टाकीजवळ पर्यावरणपूरक विसर्जनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. येथे सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत लहान मूर्तींचे विसर्जन करता येईल. निर्माल्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था आहे. गणेशाची स्थापना, आरास पर्यावरणपूरक केल्यानंतर आता विसर्जनही पर्यावरणपूरक करावे. याच उद्देशाने सुरू केलेल्या या महाअभियानात महापौरांनी जसा पुढाकार घेतला तसाच पुढाकार घेऊन विविध भागातील मंडळांनीही विसर्जनाची व्यवस्था केली आहे. या चार ठिकाणांसोबतच गणेशभक्तांना रिंग रोड येथे विनोद मापारी मित्र परिवाराच्या वतीने शिव उद्यानात आणि अजय गावंडे मित्र मंडळाच्या वतीने आदर्श कॉलनी उद्यानात पर्यावरणपूरक विसर्जन करता येणार आहे. दैनिक दिव्य मराठीने सुरू केलेल्या या महाअभियानात सहभागी होत शहरात विविध ठिकाणी ईको फ्रेंडली गणेश विसर्जन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रीवर बंदी असली तरी त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या गणेशमूर्ती आणि निर्माल्य नदी पात्रात विसर्जित केल्याने प्रदूषण वाढत आहे. नदीचे होत असलेले हे प्रदूषण थांबावे आणि गणेशोत्सव उत्साहासोबतच पर्यावरणपूरक व्हावा या उद्देशाने हे महाअभियान राबवण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...