आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाटाफुटीला फाटा, होणार थेट लढत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला, वाशीम बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रवींद्र सपकाळ यांच्यात थेट लढत होत अाहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी संजय गोपाळराव आठवले अपक्ष, यांचा अर्ज छाननीमध्ये अवैध ठरला. शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

चंद्रकांत सुभाषराव ठाकरे अपक्ष श्यामकुमार गोकूलदास राठी अपक्ष यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आता शिवसेनेचे गोपीकिशन राधाकिशन बाजोरिया राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र गंभीरराव सपकाळ या दोघांमध्ये सरळ लढत होणार आहे. २७ डिसेंबर रोजी २३ मतदान केंद्रांवर निवडणूक घेण्यात येत आहे, तर ३० डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात पार पडेल.

निरीक्षक कामकाजावर लक्ष ठेवून : विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रत्येक कामकाजावर निवडणूक निरीक्षक एस. एम. सरकुंडे लक्ष ठेवून आहेत. तिन्ही जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या ठिकाणी त्यांनी भेट देऊन पाहणी केली. मतमोजणी प्रक्रिया ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात होत असून, या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना व्यवस्था करण्याबाबतचे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांना दिले.

शॅडोपार्टीची करडी नजर
अकोला,बुलडाणा वाशीम या तीन जिल्ह्यांतील निवडणूक घडामोडींवर निवडणूक निरीक्षकांच्या नेतृत्वात शॅडो पार्टी नेमण्यात आली आहे. उमेदवाराच्या प्रत्येक घडामोडीवर या पार्टीची करडी नजर असणार आहे. निवडणूक आचार संहितेचे कुुठेही उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यात मतदान केंद्रे
निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात ५, वाशीममध्ये ३, तर बुलडाणा जिल्ह्यात १३ मतदान केंद्र, असे एकूण २३ मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...