आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावे अद्यापही गुलदस्त्यातच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेट - नगराध्यपदासाठी तिकिट मिळावे म्हणून अनेक दिग्गजांनी अातापासूनच‘सेटींग’ लावल्या अाहेत. पक्षातील वरीष्ठांकडे अापण कसे ‘लायक’ उमेदवार अाहाेत, हे पटवून देण्यासाठी प्रयत्न हाेत अाहे. त्यातील काही जण उमेदवारी मिळाल्यास बंडखाेरी करत वेगळा झेंडा हाती घेण्याचीही शक्यता अाहे. त्यामुळे पक्षपातळीवर खास दक्षता घेत उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर करण्यात अालेले नाही. प्रमुख पक्षाकडून अापल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक जण जीवाचे रान करत अाहे. सध्या अकाेट परिसरातील राजकीय चित्र अस्पष्ट असल्यामुळे कुठल्या पक्षाची माळ काेणाच्या गळ्यात पडेल, हे सांगणे कठीण अाहे.
निवडणूकीच्या धकाधकीला प्रारंभ झाला असून इच्छूक उमेदवारांना अाता बऱ्याच अग्नी परीक्षेला सामाेरे जावे लागत अाहे. प्रत्येक जण अापली बाजू भक्कमपणे दाखवण्याचा प्रयत्न करत अाहे. तरीदेखील अापल्यालाच तिकिट मिळेल, याबद्दल निश्चित काेणीही सांगू शकत नाही. यंदा अनेकांनी या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत अापले भविष्य अाजमावण्याचे ठरवले अाहे. त्यामुळे तिकिट मागणाऱ्यांची संख्या माेठी अाहे.

पक्षश्रेष्ठीनी तिकीट दिले नाही तरी रिंगणातून माघार घ्यायची नाही. अशी भूमिका अनेक उमेदवारांनी घेतली अाहे. त्यामुळे अकाेटचे राजीय वातावरण चांगलेच तापले अाहे. या निवडणूकीत अापणच विजयी हाेणार असा दावा अनेक उमेदवार अातापासूनच करत अाहे.

उमेदवारी मिळाल्यास बंडखाेरी
सर्वच बड्या पक्षांना बंडखाेरांची भिती असल्यामुळे अातापर्यंत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घाेषणा करण्यात अाली नाही. त्यात भाजप, काॅग्रेस अाणि भारिप सारख्या पक्ष सर्तकता बाळगत अाहे. एखादा कार्यकर्ता किंवा दिग्गज नेता दुखावला तर त्याची किंमत पक्षाला माेजावी लागू शकते, याची जाणीव ठेवून रणनिती अाखण्यात येत अाहे. तसेच पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते सांभाळण्याचे कामही पक्षश्रेष्ठी करत अाहे. अकाेटचे राजकीय वातावरण चांगलेच तापले अाहे.

इतर पक्षांकडेही तिकीटाची मागणी
काही नेत्यांनी पर्याय म्हणून इतर पक्षांकडेही तिकिटाची मागणी केली अाहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेही काहींनी तिकीटाची मागणी केली अाहे. त्यामुळे ही निवडणूक चूरशीची हाेणार अाहे.

भारीपमध्येही जाेरदार रस्सीखेच सुरू
भारीपचे तिकीट मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अाणि माजी नगरसेवक यांच्यात रस्सीखेच चालू आहे. या दाेघांपैकी कोणाला तिकीट मिळणार, हे काही दिवसातच स्पष्ट हाेणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तीन इच्छूक
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे माजी जिल्हा परिषद सभापती अकोटचे दोन अार्किटेक इंजिनियर तिकीट घेण्यास इच्छुक आहेत. या तिघापैकी कोणाला तिकीट मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेनेत फक्त दाेघांचीच चर्चा
सध्या शिवसेनेत फक्त दाेनच नावांची जाेरदार चर्चा हाेत अाहे. त्यात माजी तालुकाध्यक्ष अाणि माजी दिवंगत अामदारांचे चिरंजीव अाहे. या दाेघांमध्ये काेण बाजी मारते याकडे सर्वांच्या नजरा अाहेत.

भाजपमध्ये पक्षक्षेष्टींकडे नजरा
राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला सध्या अच्छे दिन अाले अाहे. त्यामुळे या निवडणूकीत पक्षश्रेष्ठींची नजर काेणावर पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे. तिकीटासाठी माजी नगराध्यक्ष, व्यापारी, नगरसेवक प्रयत्नरत अाहे.

काॅग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी
काॅग्रेस पक्षातर्फे तिकीट मागणऱ्याची मोठी यादी आहे. त्यापैकी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत दोन माजी नगराध्यक्षांची नावे सर्वात आघाडीवर आहेत. यापैकी कोणाला तिकीट मिळणार याकडे लक्ष लागले अाहे.
बातम्या आणखी आहेत...