आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्ट महिन्यातील सभेमध्ये निवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बैठकीला मार्गदर्शन करताना कदीर बागवान उपस्थित पदाधिकारी.)
अकोला- राज्यपरिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवडणूक जुलैला संघटनेच्या सभेत होणार होती. मात्र, येत्या १२ तारखेला चंद्रपूर येथे संघटनेचे राज्य अधिवेशन असल्याने त्यानंतर ऑगस्ट महिन्यातील सभेमध्ये ही निवडणूक घेण्याचा निर्णय झाला.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हनुमान मंदिर परिसरात राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची सभा आज पार पडली. याप्रसंगी विभागीय सचिव एम. के. चव्हाण, निवडणूक अधिकारी ओझलवार, कदीर बागवान, तेलगोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सभेमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ५०० रुपयांमध्ये वर्षभर एसटीची प्रवास सवलत, ग्रॅच्युटीची रक्कम त्वरित मिळणे, वैद्यकीय बिल दरमहा २५०० रुपये अदा करण्यात यावे आदी विषयांवर चर्चा करून भूमिका ठरवण्यात आली. विभागीय सचिव एम. के. चव्हाण यांनी नवीन कार्यकारिणी निवडीसंदर्भात इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन करून निवड प्रक्रिया घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
सभेला माणिकराव पेटे, गंगाबाई गायकवाड, अब्दुल कुरेशी, पुरुषोत्तम इटेकर, शेख तस्लिम, अब्दुल बशीर, कासमभाई आदींची उपस्थित होते.