आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका निवडणुकीत भाजप मुस्लिम उमेदवार देण्याचा तयारीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. त्यामुळे प्रभागाची लोकसंख्या २४ ते २९५०० पर्यंत आहे. अनेक प्रभाग हिंदू-मुस्लिम असे संमिश्र आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. हा प्रयोग भाजपने २०१२ च्या निवडणुकीतही दोन मुस्लिम उमेदवार देऊन केला होता. मात्र, या वेळी परिस्थिती वेगळी असल्याने या वेळी भाजप सात ते दहा जागी मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता आहे.
भाजपचे शहरात वर्चस्व असले आमदार गोवर्धन शर्मा यांना मुस्लिम समाजाची काही ना काही मते मिळत असली तरी महापालिका निवडणुकीत मात्र आजपर्यंत भाजपचा मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. शहरात काही भाग मुस्लिम बहुल आहे. २०१२ च्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युती केली. शिवसेनेला २७ जागा दिल्या भाजपने ३३ जागा लढवल्या, तर १३ जागी भाजपने उमेदवारच दिला नव्हता. यात मुस्लिम आणि अनुसूचित जाती बहुल प्रभागांचा समावेश आहे. मात्र, या वेळी एका प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार असून, अनेक प्रभागात मुस्लिम हिंदूची लोकसंख्या काही प्रमाणात कमी जास्त आहे. त्यामुळेच यावेळी जे प्रभाग संमिश्र आहेत, त्या प्रभागात मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी भाजपने केली असून, महापालिकेत बहुमत मिळवण्याचा प्रयत्न भाजपचा राहणार आहे.

भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीची जबाबदारी हाजी चांद खान यांच्याकडे असून, चांद खान यांनीही अल्पसंख्याक आघाडी मजबूत केली आहे. प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, १८ आदी प्रभागात भाजप मुस्लिम अथवा अल्पसंख्याक उमेदवार देण्याची शक्यता आहे.

त्याच बरोबर अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभागातही २०१२ च्या निवडणुकीत भाजपने उमेदवार दिले होते. मात्र, यावेळी १४ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने सर्वच्या सर्व अथवा किमान दहा ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी भाजप करीत आहे. जागा वाटपात शिवसेनेला कोणत्या जागा जातात,यावरही बरेचसे अवलंबून आहे. राखीव जागा शिवसेनेकडे गेल्यास भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागेवर उमेदवार देण्याची तयारी भाजपची सुरू आहे.
मुस्लिम मते मिळवण्याचा प्रयत्न
भाजपचाचेहरा मुस्लिम विरोधी आहे, असे विरोधक सातत्याने दर्शवतात. याला फाटा देण्याचाही या निमित्ताने भाजपचा प्रयत्न राहणार असून, या निमित्ताने मुस्लिम मते भाजपकडे वळल्यास त्याचा फायदा विधानसभा लोकसभेतही होऊ शकतो. असा सुरही भाजपमध्ये सुरु आहे.
बातम्या आणखी आहेत...