आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीसाठी ९८ उमेदवार रिंगणात, तालुक्यात २,३९४ मतदार; निवडणूक रंगणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला रंग चढला असून, निवडणुकीसाठी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची ऑगस्ट रोजी छाननी करण्यात आली. यांपैकी ९८ उमेदवारांचे अर्ज स्विकृत, तर त्रुट्यांअभावी अस्विकृत करण्यात आले. ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

इतर निवडणुकांप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकसुद्धा ग्रामीण भागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असते. तालुक्यात बाजार समितीवर गेल्या ४० वर्षांपासून सहकार पॅनलचे धोत्रे कंपनीने वर्चस्व प्रस्थापित केलेले दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री वसंतराव धोत्रे यांनी शेतकऱ्यांच्या हितावह घेतलेल्या अनेकविध निर्णयांमुळे सहकार पॅनलला तालुक्यातील मतदारांनी झुकते माप देऊन बहुमताने विजयी केल्याचा इतिहास आहे. सन २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलला बहुमत मिळून शिरीष धोत्रे यांची सभापतिपदावर निवड झाली. बाजार समितीची निवडणूक २०१३ मध्येच होणार होती. मात्र, ही निवडणूक पुढे ढकलण्यात येऊन बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आला. दरम्यान, १५ जुलै रोजी बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर ३० जुलैपर्यंत उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे सादर केली.

तालुक्यातील विविध ठिकाणच्या १०३ उमेदवारांनी ११५ नामनिर्देशनपत्रे सादर केली. उपविभागीय अधिकारी कार्यालयात या अर्जांची सकाळी ११ ते दुपारी दरम्यान छाननी करण्यात आली. यात निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी यांपैकी ९८ नामनिर्देशनपत्रे वैध, तर अपात्र ठरवली. या प्रक्रियेत सहायक निवडणूक अधिकारी म्हणून सहायक पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, तालुका उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांच्यासह कैलास सोळंके आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रम असा
- २१ऑगस्ट - उमेदवार मागे घेण्याची तारीख
- २२ ऑगस्ट - अंतिम यादी चिन्ह वाटप
- ६ सप्टेंबर - निवडणूक
- ८ सप्टेंबर - निकाल

दृष्टिक्षेपात बाजार समिती निवडणूक
मतदारसंघसदस्य मतदार
सेवा सहकारी सोसायटी ११ ९०८
ग्रामपंचायत ०४ ८८५
व्यापारी आडते ३०९
हमाल व्यापारी २९२
एकूण १८ २३९४
बातम्या आणखी आहेत...