आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी सदस्य निवड प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे रवाना; पुढील आठवड्यात सभापतींची निवडणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेतील स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव अमरावती विभागीय आयुक्तांकडे नगर सचिव अनिल बिडवे यांनी रवाना केला. त्यामुळे पुढच्या आठवड्यात स्थायी समिती सभापती महिला बालकल्याण समिती सभापतीसह झोन समिती सभापतींची निवडणूक होऊ शकते. 

महापालिकेत महापौर, उपमहापौरांची निवड झाल्या नंतर स्थायी समिती सदस्य निवड रखडली होती. परंतु १५ एप्रिलला झालेल्या सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली. यात भाजपचे दहा तर कॉग्रेस, लोकशाही आघाडी आणि शिवसेना आघाडीचे प्रत्येकी दोन सदस्य निवडले गेले. त्याच बरोबर महिला बाल कल्याण समितीतील नऊ सदस्यांची निवड करण्यात आली. यात सहा सदस्य भाजप आघाडीचे तर विरोधी गटाचे तीन सदस्य आहेत. त्याच बरोबर झोन समित्याही निश्चित करण्यात आल्या. 

शनिवारी झालेल्या या सभेतील मंजुर प्रस्ताव मंगळवारी तयार करुन अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात विभागीय आयुक्तांकडून स्थायी समिती सभापती, महिला बाल कल्याण समिती सभापती आणि झोन समिती सदस्य निवड तसेच सभापती निवडणुकीच्या तारखा निश्चित केल्या जाऊ शकतात. त्यामुळेच स्थायी समितीतील १६ सदस्यांचे आता सभापती कोण? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे. 

१६ सदस्यीय स्थायी समितीत दहा सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपकडे स्थायी समिती सभापतीपद राहणार आहे. तूर्तास बाळ टाले, अजय शर्मा, हरीश आलिमचंदानी आणि सुनिल क्षीरसागर यांच्यात सभापतीपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. तर महिला बाल कल्याण समिती सभापतीपदावर कोणाची निवड होते ? याबाबतही तर्क वितर्क लढवले जात आहेत. 
बातम्या आणखी आहेत...