आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाज फैसला, भारिप-बमसं महाअाघाडी सज्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हापरिषद सभापतीपदाची निवडणूक बुधवारी हाेणार असून, यासाठी भारिप-बमसं महाअाघाडीने कंबर कसली अाहे. काँग्रेस शिवसेनेने सर्वच पर्याय खुले असल्याचे जाहीर केले असून, भाजपला मात्र सभापतीपद हवे अाहे.
जिल्हा परिषदमध्ये भारिप-बमसंची सत्ता असून, विविध याेजना राबवण्यात अपयश अाल्याचा अाराेप करत महाअाघाडी स्थापन करण्यात अाली. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी स्थापन करण्यात अालेल्या महाअाघाडीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सहभागी झाले हाेते. महाआघाडीकडून पदाच्या निवडणुकीत अपक्षांना उभे करण्यात अाले हाेते. मात्र, शिवसेनेच्या दाेन सदस्यांनी महाअाघाडीच्या उमेदवारांना मतदान केले नाही. परिणामी, भारिप-बमसंच्या उमेदवारांचा विजय झाला हाेता. दरम्यान, १३ जुलै राेजी हाेणाऱ्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भारिप-बमसं महाअाघाडीने कंबर कसली अाहे.

काँग्रेसच्या अपेक्षा पूर्ण हाेतील? : जिल्हापरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी तयार केलेल्या महाआघाडीतील अपक्ष शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस काँग्रेसच्या मुळावर उठल्याचे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या निमित्ताने दिसून अाले हाेते.

त्यामुळे अाता सभापतीपदाच्या निवडणुकीत तरी संधी द्यावी, अशी अपेक्षा काँग्रेस सदस्यांना अाहे. या अपेक्षांची पूर्तता हाेईल की नाही, हे बुधवारी स्पष्ट हाेईलच.

पाठिंबा देणाऱ्यांचे हाेईल भले?
अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारिप-बमसंच्या उमेदवारांना शिवसेनेच्या माधुरी गावंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने मतदान केले हाेते. शिवसेनेचे चंद्रशेखर पांडे हे तटस्थ राहिले हाेते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाेघांना सभापती पद मिळणार अाहे. तसेच एका सदस्याला जिल्हा परिषद निवडणुकीत भारिप-बमसं पाठिंबा देणार असल्याचे समजते.
अाज फैसला, भारिप-बमसं महाअाघाडी सज्ज
बातम्या आणखी आहेत...