आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकीय यंत्रणेने वाजवला अाता निवडणुकांचा बिगुल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मतदार याद्यांचे अपडेशन सुरु करीत आज, रविवारी जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने आगामी निवडणुकांचा बिगुल वाजवला. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील १४४६ मतदान केंद्रांवर ही मोहीम राबवली गेली. नव्या मतदारांचे अर्ज स्वीकारण्यासह जुन्यांच्या तपशिलातील आवश्यक बदल नोंदवून घेण्याचे काम या मोहिमेद्वारे केले गेले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोल्यासह राज्यभर ही मोहीम सुरु झाली आहे. परिपूर्ण (अपडेटेड) मतदार यादी घोषित होईपर्यंत अर्थात जानेवारी २०१७ पर्यंत विविध टप्प्यांमधून या मोहिमेचा प्रवास पुढे जाणार आहे. त्यातील आजचा दिवस हा विशेष मोहिमेचा दिवस होता. ऑक्टोबरला पुन्हा जिल्हाभर अशीच विशेष मोहीम राबवली जाईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

गेल्या निवडणुकीच्या वेळी अस्तित्वात असलेली मतदार यादी शनिवारी िजल्हाभर घोषित करण्यात आली. पाचही विधानसभा मतदारसंघांची मध्यवर्ती कार्यालये (एसडीओ कार्यालये), तहसील कार्यालये त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची मुख्यालये अशा ठिकाणी ही यादी नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. निवडणूक यंत्रणेच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदाराने जागरूकतेचा परिचय देत त्यांची नावे आणि वैयक्तिक माहितीचे इतर तपशील बरोबर आहेत की नाही, याची पडताळणी याठिकाणाहून करुन घ्यायची आहे. तपशिलात काही बदल असल्यास ते दुरुस्त करुन घेण्यासाठी आवश्यक ते अर्ज भरुन देण्याची सोयही याठिकाणी उपलब्ध आहे.

दरम्यान हेच कार्य व्यापक प्रमाणात व्हावे म्हणून मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दोनवेळा विशेष मोहीम राबवली जाते. त्या मोहिमेचा पहिला टप्पा आज पूर्णत्वास गेला. या मोहिमेंतर्गत जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नव्या मतदारांचे अर्ज भरुन घेणे, जुन्या मतदारांच्या नाव, लिंग, वय, पत्ता आदी माहितीत आवश्यक तो बदल नोंदवून घेणे, एखादा मतदार हयात नसेल तर त्याच्या जवळच्या नातेवाईकाकडून तशी माहिती भरुन घेणे आदी कामे केली जातात. त्यामुळे आजच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व १४४६ मतदान केंद्रांवर महसूल इतर विभागाची यंत्रणा तैनात करण्यात आली होती. मतदानाच्या दिवशी जशी चहल-पहल असते तशी नसली तरी बहुतेक जागरूक नागरिकांनी त्याठिकाणी पोहचून नमूना सहा, सात आठ यापैकी त्यांना योग्य असलेला अर्ज भरुन दिला. अशीच एक दिवसीय संधी पुन्हा ऑक्टोबरच्या रविवारीही उपलब्ध होणार अाहे.

आठवडाभरात अहवाल
^आजची मोहीम अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मुर्तीजापूर, अकोट बाळापूर या पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये राबवली गेली. त्याठिकाणी प्राप्त अर्जांचा अहवाल मागवण्यात आला आहे. या अहवालातूनच किती जणांनी नव्याने मतदार होण्यासाठीचे अर्ज दाखल केले आणि किती जणांच्या तपशिलांमध्ये बदल करावयाचा आहे, हे स्पष्ट होईल. आठवठाभरात असा एकत्रीत अहवाल तयार होणार आहे.’’ उदयसिंह राजपुत, उपजिल्हाधिकारी, अकोला.

जानेवारीला यादीची प्रसिद्धी
१४ आक्टोबरपर्यंत प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी दाव्यांचे निराकरण १६ नोव्हेंबरपर्यंत करण्याचे आदेश आहेत. दरम्यानच्या काळात निवडणूक यंत्रणेतर्फे त्या-त्या मतदाराला (अर्थात ज्यांनी अर्ज भरुन दिले आहेत, अशांनाच) कार्यालयांमध्ये बोलावून आवश्यक त्या दस्तावेजांची तपासणी केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया आटोपली की १५ डिसेंबरपर्यंत डाटाबेसचे अद्ययावतीकरण करुन जानेवारी २०१७ रोजी परिपूर्ण मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महिनाभराचा अवधी
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १६ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या महिनाभराच्या काळात जुन्या मतदारांना त्यांचे दावे हरकती नोंदवता येणार आहेत. अर्थात नाव, वय, लिंग पत्ता यातील चुकांची दुरुस्ती करुन घेण्यासाठीचे अर्ज या काळात भरुन देता येणार आहेत. हे अर्ज तहसील कार्यालयांतील निवडणूक विभागात स्वीकारले जातील.
बातम्या आणखी आहेत...