आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची स्वबळाची तयारी, पक्ष बांधणीसाठी नवा ‘अॅक्शन प्लॅन’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - केंद्र राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला शह देण्यासाठी जिल्ह्यात शिवसेनेने कंबर कसली असून, अागामी नगर परिषद, मनपा निवडणूक स्वबळावर लढावी, असा सूर शनिवारी अायाेजित पक्षाच्या बैठकीत उमटला. यावर पदाधिकाऱ्यांनी युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असून, पक्ष बांधणीसाठी सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न करा, असे अावाहन केले. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्ष बांधणी प्रचारासाठी ग्रामीण भागातील शिवसैनिक शहरात येणार अाहेत.
महापालिका, राज्य केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या सत्तेत शिवसेना सहभागी अाहे. मात्र, भाजप-शिवसेना एकमेकांवर अाराेप-प्रत्याराेप करण्याची एकही संधी साेडत नाही. येणाऱ्या काळात शिवसेना लहान भावाच्या भूमिकेत राहण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे जिल्ह्यात हाेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयश्री खेचून अाणण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली अाहे. दरम्यान, शिवसेनेत फेरबदल झाल्यानंतर शनिवारी प्रथमच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात अागामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर चर्चा केली. या वेळी प्रमुख सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला महिला अाघाडीच्या नेत्या ज्योत्सना चोरे, उपशहरप्रमुख योगेश अग्रवाल, जि. प. सदस्य नितीन देशमुख, धनंजय गावंडे, प्रदीप गुरुखुद्दे, नगरसेवक शरद तुरकर, मंजुषा शेळके, देवश्री ठाकरे, पंकज गावंडे, मुन्ना मिश्रा, राजेश वगारे, संजय भांबरे, गजानन चव्हाण, सागर भारूका, किशाेर ठाकरे, रवींद्र मुर्तडकर, शंकर पाताेंड, संजय शेळके, श्याम गावंडे उपस्थित हाेते.
यांचाझाला सत्कार : बैठकीतसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, मुकेश मुरुमकार-उपजिल्हा प्रमुख (अकाेला पूर्व विधानसभा), बंडू ढाेरे-उपिजल्हा प्रमुख (मूर्तिजापूर बार्शिटाकळी), दिलीप बाेचे-उपजिल्हाप्रमुख (अकाेट तेल्हारा तालुका), राजेंद्र पाेहरे-(बाळापूर पातूर), अकाेला पूर्व शहर संघटक तरुण बगेरे, वि पश्चिम शहर संघटक संताेष अनासने यांचा सत्कार केला.

लवकरच अंमलजबजावणी
शिवसेनापक्ष बांधणीसाठी तयार केलेल्या ‘अॅक्शन प्लॅन’ची लवकरच अंमलबजावणी हाेणार अाहे. या अॅक्शन प्लॅननुसार विविध प्रभागांमध्ये ८० शाखाप्रमुखांसह उपविभाग प्रमुखांचे जाळे विणण्यात येणार अाहे. यासाठी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात येणार अाहे. अॅक्शन प्लॅन सप्टेंबर महिन्यात अकाेला दाैऱ्यावर असलेले संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तयार केला हाेता.

सदस्य नाेंदणीवर प्रमुखांचा ‘वाच’ : सदस्य नाेंदणी प्रत्येक विभागात हाेणार असून, यासाठी अाता मंडपही टाकण्यात येणार अाहे. सदस्य नाेंदणीच्या ठिकाणी सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर जिल्हाप्रमुख नितीन देशमुख हे भेटी देणार अाहेत. याप्रसंगी ते प्रमुख पदािधकाऱ्यांची बैठक घेऊन नाेंदणीचा अाढावा घेणार अाहेत. शहरात एकूण २० प्रभाग असून दाेन शहर प्रमुख राजेश मिश्रा अतुल पवनीकर यांच्यावर प्रत्येकी १० प्रभागांची जबाबदारी देण्यात येणार अाहे.

शिवसैनिकच हिंदूत्वाचा पाईक
शिवसेनेनेच हिंदूत्वाच्या मुद्यावर कायम असून, शिवसैनिकच हिंदूत्वाचा पाईक अाहे, असे मत जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी व्यक्त केले. मनपामध्ये काँग्रेस,भारिपच्या काळात काेणताच विकास झाला नाही. शिवसेना-भाजप सत्तेवर असताना शहराचा विकास झाला. त्याकाळात सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर उपमहापाैर हाेते, असेही देशमुख यांनी नमूद केले.

मदत ठरणार निर्णायक
हद्दवाढीने २४ गावे महापालिकेत समाविष्ट झाली अाहेत. त्यामुळे ग्रामीण भागावर शिवसेनेची मजबूत पकड असल्याने मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर ग्रामीण भागातील शिवसैनिक शहरात पक्ष बांधणी प्रचारसाठी येणार अाहेत. ग्रामीण भागातील शिवसैनिकांचा शहरातही जनसंपर्कचा फायदा पक्षाला निवडणुकीत हाेईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांना अाहे.
शिवसेनेच्या बैठकीत बाेलताना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख उपस्थित जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...