आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत पारेषण कंपनी कर्मचारी वसाहत समस्यांच्या विळख्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- विद्युतपारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेली वसाहत अनेक समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. सर्वांना प्रकाशमान ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्येच पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे वसाहतीची दुरवस्था ही "दिव्याखाली अंधार' अशीच झाली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी दर्यापूर मार्गावर वसाहत बांधण्यात आली आहे. या वसाहतीमधील निवासस्थाने जीर्ण झाली आहेत. त्याशिवाय वसाहतीमध्ये इतरत्र असलेल्या कॉलनीचे सांडपाणी येते. त्याचा निचरा करण्याची सोय नसल्याने कर्मचाऱ्यांना गटारातूनच जावे लागते.

कूपनलिकाबंद : दर्यापूरमार्गावरील विद्युत पारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला पाणीपुरवठा करणारी कूपनलिका गत चार दिवसांपासून बंद आहे. वसाहतीमधील रहिवाशांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गृहिणींना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाणी नसल्यामुळे दैनंदिन कामे प्रभावित झाली आहेत.

कर्मचाऱ्यांचीगैरसोय : विद्युतपारेषण किंवा विद्युत वितरण कंपनीमध्ये नोकरी करताना कर्मचाऱ्यांची शिफ्टमध्ये ड्युटी असते. आठ तास काम करून आल्यावर कर्मचाऱ्यांना वसाहतीमधे गैरसोयीमुळे त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती बदलणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

पिण्याचेपाणी घ्यावे लागते विकत : कूपनलिकाबंद पडल्यामुळे सर्वांचेच मोठे हाल होत आहेत. दर्यापूर मार्गावर पालिकेचे सार्वजनिक नळ नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दूरवरून पाणी आणावे लागतेे. काही कर्मचाऱ्यांना तर पिण्याचे पाणी विकत आणावे लागते.

शहरातघरांचे भाडे महाग : अकाेटशहरात घरांचे भाडे महाग आहे. भत्त्यापेक्षा घरभाडे जास्त आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर भाडे आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव कर्मचाऱ्यांना वसाहतीमध्ये राहावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

परिसराची स्वच्छता हवी
दर्यापूरमार्गावरअसलेल्या विद्युत पारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये सफाई करणे गरजेचे आहे. अन्यथा साथरोग पसरून वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या कुटंुबीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. डॉ. बकूल व्यवहारे, अकोट

पत्र व्यवहार केला
कर्मचाऱ्यांच्यावसाहतीमधीलसमस्यांबाबत पारेषणच्या सिव्हिल विभागासोबत पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी पाहणी केली आहे. वसाहतीमधील समस्या लवकरच सोडवण्यात येतील. आर. एम. टिकस, सहायकअभियंता, विद्युत उपकेंद्र, अकोट

अधिकाऱ्यांनी द्यावे लक्ष
^वसाहतीमध्येराहणाऱ्याकुटुंबीयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समस्यांचा निपटारा करण्यासाठी त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. धनराज हिवरे, सचिव,म. रा. वि. तांत्रिक संघटना, अकोट

साथ रोगांची शक्यता
वसाहतीच्या परिसरात पाणी साचलेले दिसून येते. त्यामुळे साथ रोगांची शक्यता बळावली आहे. साचलेल्या पाण्यात डास तयार होत असल्यामुळे हिवताप इतर रोग होण्याची भीती व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...