आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत सुरक्षेचे धडे घेत विद्यार्थी करणार उपकरणे वापराबाबत जागृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती हाेण्यासाठी जिल्ह्यात ११ ते १७ जानेवारी या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार अाहे. सप्ताहमध्ये विद्यार्थ्यांचेे विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येणार अाहे. याचे अाचरण विद्यार्थ्यांनी घरी करावे, त्यांनी याबाबत कुटुंबातील सदस्यांमध्ये जागृती करावी, या उद्देशाने अाता शासनाने शाळेतच विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला अाहे. विद्युत उपकरणे हाताळताना खबरदारी घेतल्याने अनेकदा दुर्दैवी घटना घडतात. अाेल्या हाताने इलेक्ट्रिक माेटारपंप सुरु करणे, विद्युत प्रवाह सुरु असलेले अणि बादलीत असलेल्या हिटरला धरणे, अादींमुळे अपघात घडतात. या घटनांमध्ये अनेकदा मानवी बळीही जाताे. त्यामुळे विद्युत सुरक्षेबाबत विद्यार्थी जनजागृती करणार आहेत. कुटुंबीयांना उपकरणे वापराबद्दल माहिती देणार आहेत. 
विद्यार्थी घेणार विद्युत सुरक्षेबाबत प्रतिज्ञा 
 
Àविद्युत सुरक्षा सप्ताहात शाळेतील दैनंदिन प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांकडून विद्युत सुरक्षेबाबत प्रतिज्ञा वाचून घेण्यात येणार अाहे. ही प्रार्थना इयत्ता वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांकडून वाचून घेण्यात येईल. प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे वाचून घेण्यात येणार अाहे. 

Àअाेल्या हातांनी विद्युत उपकरणास, बटनास स्पर्श करणार नाही इतरांनीही स्पर्श करु देणार नाही. 

Àघरातील मंडळीला माेबाईल चार्ज झाल्यानंतर स्वीच बंद करुन चार्जर काढून घेण्यास सांगणार. 
Àपालकांकडे नेहमी अायएसअाय मार्क अथवा शासनाने गुणवत्ता प्रमाणपत्र दिलेल्या विद्युत उपकरणांचीच खरेदी करण्यासाठी अाग्रह धरेल.
Àविद्युत वाहिनी खाली पतंग उडवणार नाही. 
Àमी माझे मित्र विद्युत वाहिनी जवळ असलेल्या झाडांच्या फांद्या हलवणार नाही इतरांनाही हलवू देणार नाही. 
Àइमारतीमध्ये अाग लागली असताना लिफ्टचा वापर करणार नाही अणि इतरांनाही करु देणार नाही. 
Àजमिनीवर पडलेल्या उघड्या तारांना स्पर्श करणार नाही इतरांनाही करुन देणार अाहे. 
Àविजेच्या खांबाला जनावरे बांधणे धोकादायक अाहे. असे करणाऱ्यांना ‘तसे करु नका’ हे मी त्यांना सांगणार. 
Àवडिलधाऱ्या मंडळीस विजेच्या खांबास तार बांधून त्यावर अाेले कपडे वाळवू देणार नाही. असे केल्याने सर्वांचे जीवन सुरक्षित राहील. 

विविध स्पर्धांचे अायाेजन 
जनजागृती हाेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये ही बाब बिंबवण्यात येणार अाहे. सप्ताहमध्ये विद्युत सुरक्षेबाबत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अायाेजित करण्यात येणार अाहे. विद्युत सुरक्षेवर अाधारित इतरही कार्यक्रम, उपक्रमांचे अायाेजन शाळा स्तरावर करण्यात येणार अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...