आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज देयकाची एसएमएसद्वारे मिळणार माहिती , ग्राहकांनो, मोबाइल क्रमांक नोंदवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वीज ग्राहकांना आता त्यांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे वीज बिलाची माहिती देयकाचा आकडा माहीत होणार आहे. यासोबतच ग्राहकांच्या ई-मेल आयडीवरसुद्धा बिल पाठवण्याची सुविधा महावितरण करणार आहे. याची पूर्वतयारी महावितरणने केली असून, ग्राहकांचा मोबाइल नंबर, मेल आयडी आदी माहिती संकलित करण्यात येत आहे. महावितरणकडून मिळणाऱ्या ह्या सुविधा ग्राहकांसाठी ई-लर्निंग ठरत आहेत.
महावितरणने आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारले आहे. वीज ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सेवा देताना आपली सामाजिक बांधिलकी जपत महावितरण लोकाभिमुख होत आहे. गत ११ वर्षांत महावितरणच्या ग्राहक संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सर्वात मोठे वीज वितरणाचे जाळे दर्जेदार वीजपुरवठा ही महावितरणाची विशेष ओळख आहे. ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न होत असूून, महावितरणने ग्राहकांचा मोबाइल क्रमांक ई-मेल आयडीची नोंदणी करण्याचे ठरवले आहे. या अनुषंगाने तशी तयारी महावितरणच्या यंत्रणेकडून सुरू आहे. आतापर्यंत काही महानगरात मोबाइल क्रमांक, मेल आयडीवर ग्राहकांना वीज बिलाची माहिती दिल्या जात आहे. येत्या काही दिवसांत अकोला जिल्ह्यातसुद्धा अशी सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.

महानगरात ग्राहकांना सुविधा
आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढला वापर
वीज ग्राहकाच्या मागणीनुसार ई-मेलद्वारे देण्यात येत आहे. ही सुविधा राज्यातील पुणे पिंपरी चिंचवड, नागपूर शहर, औरंगाबाद वाशी या शहरातील वीज ग्राहकांना देण्यात येत आहे. राज्यातील २३ लाख वीज ग्राहकांनी मोबाइल क्रमांक अथवा ई-मेल आयडीची नोंदणी केलीे.
महावितरण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या माध्यमातून ग्राहकांना विविध योजनांची माहिती सेवा पुरवताना तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. यामध्ये महावितरण मोबाइल अॅप, महावितरणचे वेबसाइट, ऑनलाइन बिल पेमेंट, ग्राहक सुविधा मि‌‌ळेल.
^महावितरणकडून ग्राहकांचेमोबाइल नंबर ई-मेल आयडीची माहिती संकलित करून त्यांना येणाऱ्या दिवसात मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे अथवा मेल आयडीवर वीज बिलाची माहिती मिळेल. ही सुविधा वीज ग्राहकांसाठी ई-लर्निंगच आहे. अजयपाटील गोठकडे, सहा. अध्यापक, तेल्हारा.

बातम्या आणखी आहेत...