आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजार गावांपैकी केवळ ५४ ठिकाणी वीजरोधक यंत्रे, वीज पडल्याच्या घटनांत गतवर्षात जणांचा 8 बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गारपीट अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज पडून गतवर्षी वीज पडून आठ जणांचे बळी गेले. यामुळे प्रशासनातर्फे लावलेले वीजरोधक यंत्रे निकामी ठरत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील हजार गावांपैकी ५४ ठिकाणी वीज रोधक यंत्रे लावण्यात आली असल्याची माहिती आहे.
प्रत्येक मंडळात वीज रोधक यंत्रे बसवण्यात यावीत, अशी मागणी वारंवार होत असताना प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई अद्याप झालेली दिसत नाही. काही ठिकाणी जीवितहानी, तर काही ठिकाणी जनावरेही दगावली. इतर मागण्यांप्रमाणेच तिला सरकार दरबारी वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या आहेत. जिल्ह्यात वादळी पाऊस अवकाळी पावसाच्या दरम्यान वीज पडून जीवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत.

त्याअनुषंगाने प्रशासनाकडून सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यात ५४ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे. याशिवाय पृथ्वी विज्ञान केंद्र, पुणे यांच्यामार्फत जिल्हा नियंत्रण कक्षात वीज पडण्याची माहिती देणारे सेन्सर बसवण्यात आले आहे. जिल्ह्यातील अकोट अकोला तालुक्यांत वीज पडण्याचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी अनेक लोक वीज पडून मरण पावतात. अवकाळी पाऊस, वादळवारा गारांचा मारा कमी-अधिक प्रमाणात चालूच असतो. त्यामुळे विजेचा धोका बळावत चालला आहे. वीज रोधक यंत्रे जास्तीत जास्त ठिकाणी बसवली, तर विजेपासून होणारा धोका टाळल्या जाऊ शकतो. मात्र, तसे होताना दिसत नाही. वीज पडून मृत पावलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या घरी प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी भेटी देऊन सांत्वन करतात.
मात्र, या घटना टाळण्यासाठी सरकारी धोरण असतानाही प्रत्येक सज्जावर वीज रोधक यंत्र बसवण्यास कोणीही फारसे प्रयत्न करताना दिसत नसल्याची शोकांतिका आहे.

मदतदेऊन घेतली जातेय माघार : वीजकोसळून मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते. परंतु, घटनेनंतर मदत दिली की, आपली जबाबदारी संपली अशाच भूमिकेत प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी असतात.

वीज पडल्यास हे करा
वीज वादळापूर्वी संगणक, टेलिव्हिजन आदी उपकरणे बंद करा. मोबाइलचा वापर टाळा. वादळी वातावरणात विजेच्या उपकरणांचा वापर टाळा. दारे, खिडक्या बंद करून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.

प्राथमिक उपचार
वीजपडल्यास मुख्यत: मानवी हृदय श्वसन प्रक्रियेत अडथळा येतो. विद्युत आघात झाल्यास लगेच हृदयाजवळील भागाच्या परिसराला मालिश करावे. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.

अशी घ्यावी घराबाहेर काळजी
- आकाशातवीज चमकल्यावर दहा सेकंदांनी मेघ गर्जनांचा. आवाज आल्यास तिथल्या किलोमीटर परिसरात वीज पडण्याची शक्यता समजावी.
- शेतात काम करीत असाल तर जिथे आहात तिथेच राहावे. पायाखाली लाकूड, कोरडा पालापाचोळा ठेवा.
- दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवा. डोके जमिनीवर टेकवू नका.
- आपले वाहन विजेचे खांब झाडे यापासून दूर ठेवून सावकाश चालावे.
- आपण एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून खाली वाकून बसावे.