आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाण्‍यात हत्तीरोगाने पाय पसरवण्यास केली सुरुवात, एकूण 32 रुग्ण आढळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत २०१६-१७ या वर्षात हत्तीरोगाचे तब्बल ३२ रुग्ण आढळले आहे. तर जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात हत्तीरोगाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. 
 
लिम्फॅटीर फायलेरीयासिस यालाच हत्तीरोग या सामान्य नावाने ओळखले जाते. हा एक शरीर विद्रूप करणारा, अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो. प्रौढ व्यक्तीमधे लक्षावधी अत्यंत लहान, अपक्व अळ्या ज्यांना मायक्रोफिलेरीई असे म्हणतात त्या तयार होतात. त्या शरीराच्या बाह्य स्तरावर फिरत राहतात आणि त्यांची पैदास ही रात्री होते. अळ्या ४-६ वर्षे जगतात आणि आणखी अळ्या निर्माण करतात. हत्तीरोग हा डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. ज्या व्यक्तीच्या शरीरात सूक्ष्म अळ्या असतात त्या व्यक्तीला डास चावल्यानंतर त्याच्या शरीरात शिरतात. 

त्या डासांच्या शरीरात त्या अळ्यांचा विकास होण्यासाठी ते २१ दिवस लागतात. क्युलेक्स नावाच्या डासाची मादी चावल्यानंतर होणाऱ्या या हत्तीरोगाचे दोन प्रकार असून यामध्ये एक अंडवृद्धी आणि दुसरा रुग्णाचे हत्तीसारखे गुडघ्यापासून पाय सुजतात. हत्तीरोग हा एकदम होत नसल्याने अगोदर पायाचा काही भाग सुजतो. हा रोग झाल्याने मनुष्य मरत नाही, परंतु त्याला कायमचे अपंगत्व येते. जिल्ह्यात हिवताप कार्यालयाच्या वतीने हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम राबवली गेली. यामध्ये ३२ रुग्ण आढळून आले असून यामध्ये अंडवृद्धीचा रुग्ण आढळून आला आहे. अंडवृद्धीच्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षात कमी आली आहे. याकरीता हिवताप कार्यालयाच्या वतीने अंडवृद्धीच्या रुग्णांना समजावून शस्त्रक्रिया करुन घेतल्याने रुग्णांची संख्या घटली आहे. 

मागील वर्षी २०१६-१७ मध्ये अंडवृद्धीचे रुग्ण होते. परंतु एक अंडवृद्धीचा रुग्ण सुरत येथे रहिवासाला गेल्याने आता रुग्ण राहिला आहे. तर या रोगाचे प्रमाणात घाटाखाली जास्त आढळून आले आहे. तसेच जिल्ह्यातील नांदुरा, जळगाव जामोद, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, चिखली या तालुक्यातील हत्तीरोगाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. सदर रोग पुर्णपणे बरा होत नसला तरी योग्य उपचार घेतल्यास रोगाची वाढ खुंटते. 
 
हत्तीरोगाचेनवीन रुग्ण आढळले : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात राबवलेल्या हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम दरम्यान हत्तीरोग ग्रस्त काही रुग्णांचे वयाेवृद्धपणे निधन झाले. तर यावर्षी परत नवीन रुग्ण आढळून आल्याने हत्तीरोगाची संख्या जैसे थेच झाली आहे. 
 
रात्रीच्या घ्यावे लागतात रक्ताचे नमुने 
अनेक महिने ते वर्षांपर्यंत अनेकवेळा डास चावल्यास हत्तीरोग होतो. या रोगाचे जंतू दिवसा जॉइंटच्या ठिकाणी अडकून राहतात आणि रात्रीच्या वेळी रक्तात संक्रमण करतात. त्यामुळे संक्रमण रात्रीच्या वेळी रक्ताचे नमुना घेऊन तपासण्यात येतात. 

हत्तीरोगावर प्रतिबंधात्मक उपाय 
ज्या लोकांना प्रौढ अळ्यांचा संसर्ग झाला आहे त्यांना रक्तात फिरणाऱ्या सूक्ष्म जंतूंना मारण्यासाठी डीईसी औषधाचा डोस घ्यावा लागतो. उपचार कालावधी हा जास्त असल्यामुळे रुग्णाने डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानेच संपूर्ण उपचार घेणे आवश्यक आहे. तसेच सुजलेला भाग दररोज साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा, कोणत्याही जखमेवर विषाणू-विरोधी क्रीम लावल्याने उपयोगी ठरेल. 
 
बातम्या आणखी आहेत...