आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांचे चार महिन्याचे वेतन थकले, संपकाळातील १४ दिवसांच्या वेतनाची केली हाेती कपात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका कर्मचाऱ्यांचे चार महिन्याचे वेतन थकले आहे. विवाह सोहळा आणि नोटाबंदी यामुळे कर्मचारी वैतागले असून कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा ? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एकीकडे वेतन रखडले असताना दुसरीकडे मात्र विविध मोहिमा आणि निवडणुकीच्या कामात कर्मचाऱ्यांना दहा ते बारा तास काम करावे लागत आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांचे सतत वेतन थकीत राहाते. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याकडे प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. केवळ शासन निधीतून सुरु असलेल्या कामांवरच लक्ष केंद्रित केले जाते. परिणामी तीन ते पाच महिने कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहाते. दिवाळीपूर्वीही चार महिन्याचे वेतन थकले होते. दिवाळी तोंडावर आली असताना प्रशासनाने एक महिन्याचे वेतन अदा केले. मात्र वेतन देताना संपकाळातील १४ दिवसांच्या वेतनाची कपात केली. परिणामी वेतन मिळूनही कर्मचाऱ्यांना फायदा झाला नाही. अखेर दिवाळीच्या एक दिवस अगोदर कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन देण्यात आले.

दरम्यान आठ नोव्हेंबर पासून ५०० आणि १००० हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्या नंतर या नोटांतून मालमत्ता कर भरण्याचे आवाहन प्रशासनाने केले. या योजनेला नागरिकांनी प्रतिसाद दिला. कोट्यवधी रुपयाचा महसुल संकलीत झाला. त्यामुळे आता किमान एक महिन्याचे वेतन दिले जाईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती. मात्र प्रशासनाने हा पैसा निवडणुकीसाठी राखीव ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच आता पुन्हा ऑगस्ट, सप्टेंबर , ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर असे चार महिन्याचे वेतन रखडले आहे. रखडलेले वेतन केव्हा मिळेल? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

संपकाळातील वेतनाची कपात
महापालिका प्रशासनाने वेतन देताना संपकाळातील १४ दिवसांच्या वेतनाची कपात केली. परिणामी वेतन मिळूनही कर्मचाऱ्यांना फायदा झाला नाही. बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्या महिन्याचे वेतन मिळूनही काेणताही लाभ झाला नाही. पाच महिन्यांचे वेतन थकलेले असताना कर्मचाऱ्यांना केवळ एका दिवसाचे वेतन अदा करण्यात अाले. अाता कर्मचाऱ्यांचे अाॅगस्ट महिन्यापासूनचे वेतन थकल्यामुळे कर्मचारी अार्थिक विवंचनेत सापडले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...