आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमातून युवकांनी भवितव्य घडवावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिले आहे. यासाठी कुशल कामगारांची गरज भासत आहे. देशातच नव्हे, तर राज्यातसुद्धा रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र, कुशल कामगार मिळत नाहीत. शिक्षण संस्थांनी कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करून कुशल विद्यार्थी घडवण्यावर भर द्यावा, युवकांनीसुद्धा कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची निवड करून उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या उद्घाटनीय भाषणातून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील युवकांशी संवाद साधत होते. शासनाने कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय नव्याने गठित केले आहे. राज्यातील ४.५ कोटी युवक-युवतींना कौशल्य विकसित करण्याचे मंत्रालयाने ठरवले आहे. जेणेकरून त्यांना निरनिराळया क्षेत्रांत नोकरीच्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. या मंत्रालयाच्या विविध योजनांसाठी अर्थ विभागाने १६१ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. या मेळाव्याला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, बीजीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, उपाध्यक्ष शरद चौरे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, आरएलटी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, डॉ. बाहेती, डॉ. पनपालिया, रोजगार स्वयंरोजगार विभागाचे सहायक संचालक प्रफुल्ल शेळके, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मेळाव्याचे संयोजक डॉ. यू. के. भालेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंधारे यांनी केले. आभार गणेश चिमणकर यांनी मानले.
गावसोडून नोकरी करण्याची तयारी ठेवा : आपल्यागावात प्रत्येकालाच जॉब मिळेल, असे नाही. देशातच नव्हे, तर राज्यात बऱ्याच महानगरांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे बेरोजगारीच्या नावावर बोटे मोडण्यापेक्षा आपले गाव सोडून इतर ठिकाणी नोकरीच्या संधी शोधा. अनेक कंपन्यांमध्येच नव्हे, तर शासनाच्या अनेक नोकऱ्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

३५० विद्यार्थ्यांनी केली ऑनलाइन नोंदणी
मेळाव्यादरम्यान३५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. चार खासगी कंपन्यांनी कॅम्पस मुलाखती घेऊन काही उमेदवारांची निवडसुद्धा या वेळी केल्याची माहिती मेळाव्याचे संयोजक डॉ. यू. के. भालेकर यांनी दिली.

अनेक क्षेत्रांमध्ये स्किल गॅप
कृषीबांधकाम, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, फायनान्स, फार्मास्युटिकल्स, इन्शुरन्स, केमिकल या अशा अनेक क्षेत्रांतील स्किल गॅप स्टडी केला असता बांधकाम क्षेत्रात लाखांचा स्किल गॅप आहे. प्रॉडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात ३४ लाखांचा स्किल गॅप आहे. वस्त्रोद्योगात २.५ लाखांचा, अॅग्रो प्रोसेस क्षेत्रात लाखांचा स्किल गॅप आहे. राज्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत ५४६ लाखांचा स्किल गॅप आहे. स्किल गॅप म्हणजे निरनिराळया क्षेत्रांतील कौशल्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.