आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"गजराज'च्या हातोड्याने गमावली "महक'ची चमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सिव्हिललाइन्स चौकात शुभारंभाच्या प्रतीक्षेत असलेल्या हॉटेल महकच्या बांधकामावर शनिवारी दुपारी गजराजचा हातोडा चालला. महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली. मंजूर नकाशापेक्षा तिप्पट बांधकाम केल्यामुळे अतिरिक्त केलेले बांधकाम जेसीबी लावून पाडण्यात आले. सिव्हिल लाइन्स चौकातील बांधकाम पाडल्या जात असल्यामुळे अतिरिक्त बांधकाम करणाऱ्यांची चांगलीच पाचावर धारण बसली.
गणेश श्रीराम महल्ले यांचे सिव्हिल लाइन्स चौकामध्ये हॉटेल महक होते. जुन्या हॉटेलची इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत नुकतीच उभारण्यात आली आहे. आता याच हॉटेलमध्ये वरच्या मजल्यावर त्यांनी निवासाची व्यवस्था केली होती. गणेश महल्ले यांना मंजूर नकाशानुसार २५० चौरस मीटर बांधकाम करण्याची मंजुरात देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ७५० चौरस मीटर बांधकाम केले. त्यामुळे ५०० चौरस मीटर बांधकाम अतिरिक्त ठरले. त्यात पूर्वेकडे ४.५ मीटर जागा साेडणे आवश्यक असताना त्यांनी केवळ १.५ रनिंग मीटर जागा सोडली होती. त्यामुळे मीटर जागा अनधिकृत झाली.

दक्षिणेला ४.५ मीटर जागा सोडायला हवी होती. मात्र, १.८ मीटर रनिंग मीटर जागा सोडण्यात आल्याने उर्वरित बांधकाम अनधिकृत ठरले. पश्चिमेला मीटर जागा सोडणे आवश्यक असताना काहीच जागा सोडली नाही आणि पूर्णच जागेवर बांधकाम करण्यात आले, तर उत्तरेकडे काॅमनवाॅल असल्यामुळे जागा सोडण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे ५०० चौरस मीटर जागेवर अतिक्रमण करण्यात आल्यामुळे त्यावर बांधकाम केल्यामुळे शनिवारी महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटावची कारवाई केली. आयुक्त अजय लहाने यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, नगररचना विभागाचे अभियंता राजेंद्र टापरे, अतिक्रमण अधिकारी विष्णू डोंगरे, विजय बडोणे, संजय थोरात, आरोग्य अधिकारी शैलेश पवार, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, विनोद वानखडे, संजय डोंगरे, सय्यद रफीक, अझरुद्दीन, सुभाष ठाकूर, सिद्धार्थ सिरसाट, बाबाराव सिरसाट, सूर्यकांत बनसोड, अशोक मृदुंगे यांनी कारवाई केली. सिव्हिल लाइन्स चौकात हॉटेल महकवर कारवाई सुरू असताना तेथून जाणारे वाहनधारक त्यांची वाहने थांबवून कारवाई पाहत होते. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. या वेळी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गर्दी पांगवून थांबणाऱ्यांचे लायसन्स तपासणी सुरू केली आणि आपले कारवाईचे उद्दिष्टही साध्य केले.
बांधकाम पक्के असल्यामुळे ते पाडणे कठीण जात होते. त्याचदरम्यान जेसीबीच्या पंजाचा दात तुटल्यामुळे काहीवेळ मोहीम थांबवण्यात आली. नंतर दुसरे जेसीबी दाखल केले. त्यानंतर दोन जेसीबीच्या साहाय्याने बांधकाम तोडले.

आयुक्तांची होती नजर
सिव्हिल लाइन्स रस्त्याची पाहणी करण्यासाठी आयुक्त अजय लहाने शुक्रवारी सायंकाळी अाले होते. याचवेळी त्यांचे लक्ष हॉटेल महकवर गेले. दाल मे कुछ काला है, असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हॉटेल महकची फाइल काढायला लावली आणि बांधकामाचे मोजमाप करायला लावले आणि थेट कारवाईचे आदेश दिल्याची चर्चा घटनास्थळी होती