आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जवाहर नगर चौकाने घेतला मोकळा श्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गेल्याकाही दिवसापासून बंद झालेली अतिक्रमण हटाव मोहिम २२ नोव्हेंबरला पुन्हा राबवण्यात आली. जवाहर नगर चौकातील महापालिकेच्या जागेत झालेल्या अतिक्रमणाचा सफाया अतिक्रमण हटाव पथकाने केला. दरम्यान या मोहिमे मुळे जवाहर नगर ते दुध डेअरी मार्गावरील पक्के अतिक्रमण पाडण्याचे काम सुरु झाले, अशी अफवा पसरल्याने बघ्यांनी गर्दी केली होती.
महापालिका अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने दिवाळी नंतर महापालिका क्षेत्रात अतिक्रमण हटाव मोहिम राबविल्या जात आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून ही मोहिम थंडावली होती. मात्र ही मोहिम पुन्हा सुरु करण्यात आली. जवाहर नगर चौक परिसरात महापालिकेची खुली जागा आहे. या जागेवर काही लघु व्यावसायीकांनी दुकाने थाटली आहेत तर चहाची दुकाने, पानटपऱ्या ही लावल्या आहेत. यापूर्वीही अतिक्रमण हटाव मोहिमेत हे अतिक्रमण काढण्यात आले होते.

अतिक्रमण हटाव पथकाने या चौकातील तसेच महापालिकेच्या जागेतील सर्व प्रकारचे अतिक्रमण काढले. दरम्यान जवाहर नगर ते दुध डेअरी या मार्गावरील रस्त्यात आलेले बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या अनुषंगाने भूमि अभिलेखा कार्यालयाच्या वतीने मोजणीचे काम सुरु आहे.

त्यामुळे पक्के अतिक्रमण काढण्याची अफवा पसरल्याने बघ्यांनी गर्दी केली होती. ही मोहिम राजेंद्र घनबहादूर यांच्या मार्गदर्शनाखील राबविण्यात आली. या मोहिमेत अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचारी, सुरक्षा रक्षक सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...