आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लग्न केलेला इंजिनिअर चढला तिसऱ्यांदा बोहल्यावर, अशी केली युवतीची फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दोन लग्न केलेल्या रामटेक येथील एका तथाकथित इंजिनिअरने आपल्या आधीच्या लग्नांची माहिती लपवून तिसऱ्यांदा खदान येथील एका युवतीशी विवाह करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी त्याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. 

सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याचे सांगून रामटेक येथील रहिवासी सचिन कल्याणसिंह सेंगर याने अकोल्यातील खदान परिसरातील रहिवासी असलेल्या ममता धरमसिंह ठाकूर यांच्याशी २८ एप्रिल २०१७ रोजी विवाह केला. सचिन सेंगर याने ममता हिला रायगड येथे नोकरीवर असल्याचेही सांगितले, विवाहानंतर सेंगर हा नागपूर येथील निवासस्थानीच राहत असल्याने ममता यांनी पतीला नोकरी संदर्भात विचारणा केली, मात्र त्याने नागपुरातील एका आॅटोमोबाईल कंपनीत असल्याचे सांगून विषय टाळला, त्यानंतर दिवाळीला सचिन सेंगर याचे गाव नागपूर जिल्ह्यातील इंदोरा येथे गेले असतांना ममता या घराची साफसफाई करीत होत्या, यावेळी सचिन सेंगर याच्या पहिल्या लग्नाचे काही छायाचित्र घटस्फोटाचे दस्तावेज दिसले, त्यांनी पती सेंगरला विचारणा केली असता त्याने पहिल्या पत्नीला आजाराचे कारण सांगून घटस्फोट दिल्याचे सांगितले. 

हा वाद मिटविल्या जात नाही, तेच ममता ठाकूर यांच्या मोबाईल क्रमांकावर आणखी एका महिलेने फोन करून सचिन सेंगर याची दुसरी पत्नी असल्याचे सांगून एक अपत्यही असल्याचे त्या महिलेने सांगितले. त्यानंतर ममता नातेवाईंकानी चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोमवारी ममता ठाकूर यांनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. खदान पोलिसांनी पती सचिन सेंगर, सासरे कल्याणसिंग सेंगर, सासू चंद्रकांता सेंगर, नणंद मनीषा, सरीता, दीपा नीलिमा या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खिळ्यांचा कारखाना टाकण्यासाठी ममताला माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता,असेही तक्रारीत नमूद केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...