आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता: इस्टेट ब्रोकर खत्री यांची प्रॉपर्टीच्या वादातून हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमठाणा येथील घटनास्थळावरून किशोर खत्री यांचा मृतदेह विच्छेदनासाठी नेताना.
अकोला - धारदार शस्त्राने तोंडावर वार करून, छातीवर गोळी झाडून इस्टेट ब्रोकर बिल्डर किशोर खत्री यांची हत्या करण्यात आल्याची घटना नोव्हेंबर रोजी शहराजवळ असलेल्या सोमठाणा शिवारात दुपारी ४.३० वाजता घडली. दरम्यान, रणजितसिंह चुंगडे यांच्या दोन मुलांना याप्रकरणी रात्री ११.३० वाजता जुने शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या घटनेने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

बांधकाम व्यावसायिक किशोर खत्री हे सकाळी घराबाहेर पडले होते. त्यांच्या काही मित्रांसोबत ते बाहेर जात असल्याचे त्यांनी घरी सांगितले होते. दरम्यान, दुपारी वाजता सिटी कोतवाली परिसरातील मॉलची पाहणी करत असताना रणजितसिंह चुंगडे हे त्या ठिकाणी आले किशोर खत्री यांना त्यांच्या गाडीमध्ये घेऊन गेले. त्यानंतर सोमठाणा येथील पोलिस पाटील यांनी दुपारी ४.३० वाजता किशोर खत्री यांचा खून झाल्याची माहिती यांच्या मुलास दिली. त्यानंतर हे वृत्त पुतण्याने दिलीप खत्री यांना सांगितले.

भावाची हत्या झाल्याचे कळताच काँग्रेस नेते, किशोर खत्री यांचे मोठे भाऊ दिलीप खत्री हे नातेवाइकांना सोबत घेऊन सोमठाणा शिवारातील घटनास्थळी पोहोचले. जुने शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रियाज शेख यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलवला. शहरातील बांधकाम व्यावसायिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान, रात्री या खुनाबद्दल शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती.
सफारी गाडी ताब्यात
सोमठाणाशिवारातून एच.एच.३० पी. ३०४० क्रमांकाची सफारी गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. पोलिसांनी तपास केला असता त्यात रक्ताचे थेंब दिसून आले.

भाजप, काँग्रेस नेत्यांची पाेलिस ठाण्यात धाव
दिलीपखत्री जुने शहर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले तेव्हा त्यांच्यासोबत खासदार संजय धोत्रे यांच्यासह भाजप, काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील हेसुद्धा जुने शहर पोलिस ठाण्यात तपासकामी दाखल झाले होते. दरम्यान, रात्री या खुनाबद्दल शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती.

सोमठाणा शिवारात झालेली किशोर खत्री यांची हत्या धारधार शस्त्राने करण्यात आली आहे. त्यांच्या शरीरावर खोल जखमा आढळून आल्या आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर नेमके मृत्यूचे कारण सांगता येईल. रियाजशेख, ठाणेदार, जुने शहर पोलिस स्टेशन.

चौकशीसाठी दोघे ताब्यात
जुनेशहर पोलिसांनी रात्री ११.३० वाजता रणजितसिंह चुंगडे यांच्या दोन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याशिवाय किशोर खत्री यांच्या दिल्ली येथील मित्रांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात जुने शहर पोलिस रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी मोर्णा नदीकाठच्या मंदिरातील दोन व्यक्तींना सुद्धा ताब्यात घेतले आहे.

दिलीप खत्री यांची तक्रार
किशोरखत्री यांचे भाऊ तथा काँग्रेस नेते दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलिस स्टेशनला रात्री ११.३० वाजता तक्रार दिली. तक्रारीनुसार मंगळवारी दुपारी वाजता रणजितसिंह चुंगडे यांच्यासोबत किशोर खत्री हे गाडीत बसून गेले होते. दुपारी ४.३० वाजता त्यांच्या पुतण्याने सोमठाणा परिसरात वडिलांची हत्या झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो, असे सांगितले. दिलीप खत्री यांनी आपल्या तक्रारीत स्पष्टपणे कोणत्या कारणाहून भावाची हत्या करण्यात आली कुणी केली, याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे पोलिसांना तपास करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या.

एसपी घटनास्थळी दाखल
हत्येचीमाहिती मिळताच पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा हे सोमठाणा शिवारातील घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीच्या आधारावर त्यांनी सोमठाणा शिवारातील मंदिरात असलेल्या काही व्यक्तींकडून माहिती घेतली. रामदासपेठचे पोलिस निरीक्षक सुभाष माकोडे, सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिरुद्ध अढाव, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...