आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप- काँग्रेस कार्यकर्ते भिडले; अामदारावर गुन्हा, कृषिमंत्र्यांनी पाठवले भाडाेत्री गुंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा  - फसव्या कर्जमाफीविराेधात  बुलडाणा येथून राज्यभर ‘एल्गार’ अांदाेलनाचा प्रारंभ करणाऱ्या काँग्रेसचे कार्यकर्ते व कर्जमाफी शेतकऱ्यांच्या फायद्याचीच, असा दावा करणारे भाजप कार्यकर्ते बुधवारी शहरातील जयस्तंभ चाैकात भिडले. या झटापटीत भाजपच्या जिल्हा परिषदेच्या सभापती श्वेताताई महाले यांना धक्काबुक्की झाली, त्यांचे मंगळसूत्र तुटले. त्यांनी पाेलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरून  काँग्रेसचे अामदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत.    
 
बुलडाणा येथील गर्दे हॉलमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात सरकारविराेधी एल्गार मेळाव्याचे आयोजन केले होते. राज्यभर होणाऱ्या या एल्गार मेळाव्यांची सुरुवातच बुलडाण्यातून करण्यात येणार असल्याने काँग्रेसचे राज्यभरातील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर काँग्रेसच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिअांदाेलन करण्याची तयारी केली हाेती. काँग्रेस कार्यालयासमोर कार्यकर्ते उभे असताना जयस्तंभ चौकातच भाजपचे कार्यकर्तेही काळ्या फिती लावून आंदोलन करत होते. याच वेळी काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. भाजपचे निषेधाचे बॅनर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फाडले.    
 
कृषिमंत्र्यांनी पाठवले भाडाेत्री गुंड   
कर्जमाफीचा एल्गार काँग्रेसने कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या जिल्ह्यातून सुरू केला. त्याला विराेध करण्यासाठी मंत्र्यांनी भाडाेत्री गुंड पाठवले. भाजपच्या सांगण्यावरून आमदार हर्षवर्धन सपकाळ व इतरांविरुद्ध खोटे गुन्हे पोलिसांनी दाखल केल्याचे काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष  आमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितले. तर  काँग्रेस अाणि भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये झालेला वाद साेडवण्यासाठी प्रयत्न करत हाेताे. त्यामुळे वाद साेडवणाऱ्यावरच खाेटा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. पाेलिसांनी लाठ्या मारल्या. त्या दाेन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागल्या. अापल्याकडून मारहाण अाणि धक्काबुक्की झाल्याचे म्हणणे चुकीचे अाहे, असा खुलासा अामदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केला अाहे.
बातम्या आणखी आहेत...