आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडक्या गणरायाला निरोप...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - उत्साह अन् अानंदाची उधळण करत अकाेलेकरांनी अापल्या लाडक्या गणरायाला रविवारी निरोप दिला. विविध सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांनी बाप्पांची शहरातून मिरवणूक काढली. यंदा डीजेवर बंदी असल्याने पारंपरिक वाद्य, ढोल-ताशांच्या गजरात निरोप देतानाच, "पुढील वर्षी लवकर या...', असे साकडे गणेशभक्तांनी घातले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, गुलालाची उधळण तसेच पुष्पाहार अर्पण करून गणरायांचे पूजन केले. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही.

गणेश घाटांवर व्यवस्था | घरगुतीविसर्जनासाठी गणेश घाटांवर व्यवस्था केली होती. सिटी कोतवालीजवळील गणेश घाट, हरिहरपेठ गणेश, निमवाडी गणेश हिंगणा गणेश घाटावर गणेश विसर्जन केले.