आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांनी पोलिस सांगून एकास लुटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मुलाच्या उपचारासाठी आणलेले २५ हजार रुपये चोरट्यांनी पोलिस असल्याचे सांगून लुटले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी वाजता हॉटेल रिजेन्सीसमोर घडली. आता डॉक्टरला कोठून पैसे द्यायचे, याची चिंता त्यांना सतावत होती. दरम्यान, या प्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

शहरातील हॉटेल रेजन्सीसमोर रस्त्याच्या बाजूला पोलिसांची गाडी उभी होती. तेथेच लहान मुलांचे एक रुग्णालय आहे. त्या रुग्णालयात मूर्तिजापूर येथील एका जणाने त्यांच्या मुलाला दवाखान्यात भरती केले. रस्त्यावर शेख नौशाद शेख इब्राहीम हे उभे होते. त्यांनी त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी २५ हजार रुपये जुळवा जुळवा करून आणले होते.

रस्त्याच्याविरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीचा आधार घेत दोघे जण त्या इसमाजवळ गेले तू वरली मटक्याचा धंदा करतोस म्हणून त्या व्यक्तीला धाकदपट केली त्याची झडती घेऊन २५ हजार रुपये घेतले. याला गाडीत टाका पोलिस ठाण्यात घेऊन चला, असे म्हणून गाडीच्या दिशेने निघून गेले. मात्र, ते पोलिस नसून चोरटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेऊन या प्रकरणाची रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.