आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावानेच हडपली जमीन, बहिणीने मिळवली परत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - थोरल्या बहिणीने धाकट्या भावाचा सांभाळ केला. मात्र, मोठा झाल्यावर बहिणीच्या गरिबीचा फायदा घेत भावाने तिची साडेचार एकर जमीन हडपली. नंतर बहिणीला भावाच्या विरोधात कोर्टाची पायरी चढावी लागली. अन् कोर्टाने बहिणीला न्याय देत भावाला चांगलीच चपराक दिली बहिणीची साडेचार एकर जमीन परत करण्याचे आदेश दिले. या वेळी बहिणीची बाजू अॅड. चेतन लोहिया यांनी मांडली.
दुर्गाबाई दौलत तराळे रा. रिधोरा ता. बाळापूर रमेश चंद्रभान भालतिलक रा. देऊळगाव ता. पातूर अशी भावा-बहिणीची नावे आहेत. दुर्गाबाई तराळे यांना पैशाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी रमेश भालतिलक यांच्याकडून दीड लाख रुपये उसणे घेतले होते. त्यासाठी पैशाची हमी म्हणून दुर्गाबाईंना त्यांच्या जमिनीचा रजिस्ट्री इसार करारनामा करण्याची अट भावाने घातली. आर्थिकदृष्ट्या हतबल असलेल्या शेतमजुरी करणाऱ्या दुर्गाबाईला काहीच पर्याय नसल्याने तिने अट मान्य केली. मात्र, ठरल्याप्रमाणे इसार करता फसवणूक करून रजिस्ट्री इसारऐवजी भावाने चक्क रजिस्ट्री खरेदी करून टाकली. रजिस्ट्री करताना संशय आल्यामुळे दुर्गाबाईने भावाला याबाबत विचारणा केली. तसेच इतर नातेवाइकांनाही विचारले. त्यानंतर नातेवाइकांच्या दबावामुळे भावाने खरेदी नाममात्र झाल्याचे सांगून खऱ्या व्यवहाराचा लेखी करारनामा १०० रुपयांच्या बॉन्डपेपरवर करून देण्यास तयार झाला. त्यावर साक्षीदारांच्या सह्याही झाल्या होत्या. दीड लाख रुपये व्याजापोटी ५० हजार रुपये पाच वर्षांनंतर परत करेल. तोपर्यंत जमीन रमेशकडेच राहील. मात्र, तो जमीन कुणालाही विकू शकणार नाही किंवा गहाणही ठेवणार नाही. तसेच पाच वर्षांत पैसे परत मिळाल्यास जमिनीचा मालक तो होईल, असे करारनाम्यात नमूद केले होते. मात्र, तीन वर्षे होण्यापूर्वीच भावाने तिची जमीन परस्पर खानापूर रोड येथील अनिल माधवराव माणिकराव यांच्या नावे कागदोपत्री एक लाख ९० हजार रुपयांमध्ये रजिस्ट्री खरेदी दाखवून हस्तांतरित केली. पाच वर्षे होण्यापूर्वी बहीण दोन लाख रुपये घेऊन भावाकडे गेली असता सदर जमीन मी आधीच विकल्याचे त्याने सांगितले. बहिणीच्या पायाखालची वाळूच सरकल्याने नवीन सावकारी अधिनियम २०१४ चा कायदा दुर्गाबाईच्या मदतीला आला. न्यायालयात दुर्गाबाई यांच्या तर्फे अॅड. चेतन लोहिया यांनी युक्तिवाद करत दोन्ही रजिस्ट्री खरेदी खत कसे दिशाभूल करणारे आहे हे मांडून खरा व्यवहार कारारनाम्याद्वारे अवैध सावकारी असल्याचे मांडले. तसेच अवैध सावकारीमध्ये बळकावलेली जमीन दुर्गाबाईला परत करण्याची गरज पडू नये म्हणून दाखवलेले खरेदी खत रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली. शेताचे हस्तांतरण ज्यांचे नावे झाले अनिल माधवराव माणिकराव यांच्यातर्फे अॅड. उमेश महल्ले अॅड. पिंपरखेडे यांनी युक्तीवाद करत सदर अर्ज गैरकायदेशीर असून तो रद्द करण्याची मागणी केली. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने सदर व्यवहार अवैध सावकारीचा असल्याचे घोषित करून दोन्ही खरेदी खत महसूल नोंदी रद्द करण्याचा आदेश मावळे यांच्या अकोला जिल्हा सहकार उपनिबंधक यांच्या न्यायालयाने पारीत केला.
बातम्या आणखी आहेत...