आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या डोक्यात घातला पंखा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पैशांच्यावादातून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात पत्नीने पतीच्या डोक्यात पंखा घातला. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत पती पोलिस ठाण्यात पोहोचला. पाठोपाठ पत्नी आणि तिचा भाऊ आला. त्यांनी ठाण्यातही पतीला मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
सुशील गणेश काळे (२५) हे पाटबंधारे विभागात नाेकरी करतात. त्यांचा आंतरजातीय विवाह आहे. मात्र, अनेक दिवसांपासून त्यांची पत्नी आणि माहेरकडून लोक त्यांचा छळ करत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. रविवारी रात्री खदान परिसरातील गोडाउनच्या मागे असलेल्या घरी सुशील आला.मुलीचा लाड करत असताना त्यांच्या पत्नीने त्यांना हजार रुपये मागितले. त्यावर कालच पैसे दिले होते आज पैसे नाही, असे म्हटले असता तिने पतीच्या डोक्यात नेमकाच दुरुस्त करून आणलेला छताचा पंखा घातला.रक्तबंबाळ झालेल्या सुशीलने पत्नी तिचा भाऊ आणि बहिणीच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली आणि थेट खदान पोलिस ठाणे गाठले.पोलिस त्यास मेडिकलसाठी घेऊन जात असतानाच पत्नी, तिची बहीण आणि भाऊ हे ठाण्यात आले. या तिघांनीही पोलिसांसमोरच सुशीलला शिवीगाळ आणि मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुशील पुन्हा ठाण्यात पळाला. याप्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी पत्नीच्या विरोधात भादंवि ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...