आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेततळे बांधून अार्थिक उत्पन्न वाढवणे गरजेचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - "मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी मागणी करा, अनुदानाची चिंता करू नका. शेततळे बांधून त्या पाण्याचा वापर करून आर्थिक उत्पन्न वाढवा', असे आवाहन अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
अकाेला पूर्व मतदारसंघात "मागेल त्याला शेततळे' योजनेचा शुभारंभ रविवारी, १७ एप्रिल रोजी तालुक्यातील सांगळूद येथे झाला. या वेळी ते बोलत होते.

तालुक्यात रविवारी एकाच वेळी १०० पेक्षा जास्त शेततळ्यांचे कामास सुरुवात झाली आहे. सांगळूद येथे सकाळी १० वाजता पार पडलेल्या उद्घाटकीय सोहळ्याला आमदार रणधीर सावरकर, अनिल गावंडे, देवेंद्र देवर, प्रगतिशील शेतकरी विजय काळे, सरपंच अमोल येले, उपसरपंच विशाल जयस्वाल, प्रकाश काकड, गोवर्धन काकड, दिनेश काळे, मनीष लांडे, गजानन चिपडे, प्रवीण हगवणे, अश्विन जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार रणधीर सावरकर यांचे हस्ते लोकप्रतिनिधी, अधिकारी मान्यवरांचे उपस्थित प्रतीकात्मक स्वरूपात १०० शेततळ्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. सांगळूद येथे काही शेततळ्यांचे भूमिपूजन सावकरांनी केले. दरम्यान, तालुक्यातील निंबी मालोकार, म्हैसपूर, बक्राबाद, वाकापूर, खडकी टाकळी, टाकळी ज. ताकोडा, कानडी, मोरगाव भाकरे, सिसा, बोंदरखेड, येवता, दहीगाव गावंडे, गोपालखेड, निंभोरा, गांधीग्राम, वल्लभनगर, गोत्रा, हिंगणा, कुरणखेड, ढगा, भौरद, डोंगरगाव, सांगळूद, गोन्दापूर, कासमपूर, तेलखेड, पळसोबु. बोरगाव मंजू, पैलपाडा, शहापूर, मुजरेमहम्मद्पूर,कौलखेड जहांगीर, शहापूर, बहादलपूर, कोठारी, नैरात, आगर, दहीहंडा, खेकडी, गनोरी, कपिलेश्वर, घुसरवाडी, घुसर, अनाकवाडी येथे शेततळ्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे.

अकोला तालुक्यात सर्वाधिक शेततळे
अमरावती विभागात अकोला तालुक्यात सर्वाधिक शेततळे झाली आहे. मुख्यमंत्र्यांनीही याचे काैतुक केले आहे. शेततळ्यांबाबतीत आघाडीवर असला पाहिजे यासाठी एसडीअाे प्रा. संजय खडसे, राजेश्वर हांडे प्रयत्न करत असल्याचे सावरकर म्हणाले.

केळीवेळीत झाले कामांचे भूमिपूजन
केळीवेळी येथे आमदार रणधीर सावरकर यांनी शेततळ्याचे भूमिपूजन केले. या वेळी भाजप कार्यकर्त्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. सावरकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई इत्यादींबाबत माहिती घेतली. केळीवेळी हे गाव खासदार धोत्रे यांनी दत्तक घेतले अाहे.

केळीवेळी येथे शेततळ्याचे भूमिपूजन करण्यात अाले.
अकोट तालुक्यातील केळीवेळी, जऊखेड, ठोकबर्डी, चोहात्ता, देवारदा, पळसोद, धामणा बु., राजुरवाडी, हनवाडी, रौंदळा, पारळा, पुंडा येथे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते शेततळ्यांच्या कामांचे भूमिपूजन झाले. पावसाळ्यापूर्वी शेततळे पूर्ण केले जाणार आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना हाेईल.