आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर - तालुक्यातील सांगळूद येथील अनिल अंबादास गावंडे (वय ४७) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची बाब मंगळवारी (दि. २१) उघडकीस आली. गावंडे यांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरातच विष प्राशन केले. कुटुंबीयांच्या घटना लक्षात आल्यानंतर त्यांना त्वरित दर्यापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर
अंत्यसंस्कारकरण्यात आले. गावंडे यांच्याकडे सहा एकर कोरडवाहू शेत आहे. या वर्षी त्यांनी उडीद, मूग कपाशीची लागवड केली होती. परंतु, पावसाच्या दडीमुळे दुबार पेरणीची त्यांना भीती होती, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्यावर गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे ८५ हजार रुपयांचे कर्ज असून, आर्थिक अडचण, पैशांची परतफेड कौटुंबिक अडचणीतून त्यांनी आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी पत्नी, असा परिवार आहे.