आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्जमुक्त करा, एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातदुष्काळी परिस्थिती असतानाही दुष्काळ जाहीर केला नाही. त्यामुळे येथील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. परिणामी, अकोला जिल्ह्याचा समावेश दुष्काळी जिल्ह्यात करावा, या मागणीसाठी शेतकरी जागर मंचने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
शेतकरी पॅकेजचे अनुदान अद्यापही अनेेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन प्रती एकरी ५० हजार रुपयांचे कर्ज द्यावे, विमा त्वरित जाहीर करावा, तसेच मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकाचा विमा त्वरित द्यावा, विद्यार्थ्यांना शालेय फी एस.टी. बसची पास मोफत द्यावी, ग्रामीण भागामध्ये उद्योग सुरू करण्याकरिता सुलभरीत्या कर्ज द्यावे, जिल्ह्यात नागरिकांसाठी पिण्याचे आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध करावे, स्वामीनाथन समिती शिफारशी ताबडतोब लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी मनोज तायडे, अविनाश नाकट, रावसाहेब साबळे, सुरेश गवळी, शिवलाल वानखडे, रघुनाथ भाकरे, राजेश खंडारे, संदीप नागे, मधुकर खराटे, विजय गावंडे, ज्ञानेश्वर पाटील वर्गे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांवरहोत असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी दुपारी वाजता येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर युवासेनेचा शेतकरी माेर्चा काढण्यात आला. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, शेतकरी नेते गजाननराव अहमदाबादकर, मंगेश काळे, अप्पू तिडके, राजू दहापुते यांच्या नेतृत्वात अग्रसेन भवनपासून मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सततची नापिकी, दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत असून, चुकीच्या पद्धतीने पैसेवारी काढण्यात येत आहे. त्यामुळे नव्याने पैसेवारी जाहीर करावी, शेतकरी कुटुंबाला मोफत पीक जीवित्वाचे विमा संरक्षण द्यावे, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपये मदत द्या, शेतीपंपावरील विद्युत बिल शेतसारा माफ करा, कपाशीला सहा हजार रुपये प्रती क्विंटल, तर तुरीला आठ हजार हरभऱ्याला ५३०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव देण्यात यावा,
जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावा, भारनियमन बंद करावे आदी मागण्या केल्या. निवेदन देताना युवासेनेचे रूपेश कडू, शिवा गव्हाणे, माणिकराव साऊतकर, रामदास तिडके, रामदास हरणे, सूरज कैथवास, संजू गुलवाडे, सुभाष पाटील, तेजराव तवर, रामेश्वर तायडे, अरविंद साबळे, अनिल देशमुख, देवीदास साबळे, रवी धारपवार, अंगद पाटील, मनोज गायकवाड, प्रवीण अवधाते, नरेंद्र घाटोळ, मनोज गायकवाड, प्रशांत मोंढे, रितेश तिडके, सचिन साबळे, पंकज बोर्डे, अमोल राऊतसह शेतकरी उपस्थित होते.

मूर्तिजापूर येथे युवासेनेने एसडीओ कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढला.
अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शेतकरी जागर मंचने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन केले.