आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांमध्ये पसरला उत्साह; बार्शिटाकळीत पेरणीस प्रारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंजर - पिंजर परिसरात मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत सापडले आहेत.
परिसरात काही ठिकाणी शेतात पाणी शिरून बांध फुटत आहेत, तर काही ठिकाणी पेरणीनंतर योग्य प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. बुधवारी रात्री निहिदा, बहिरखेडा, उमरदरी, लखमापूर, महागाव परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचले तसेच काही शेतांमधून बांध फुटून पाणी बाहेर पडले. यामुळे नुकसान झाले असून, प्रशासनाने पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दुसरीकडे वडगाव, भेडगाव, भेंडीमहाल परिसरात पुरेसा पाऊस नसल्याने पेरणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. केवळ २० टक्के पेरणी झाली आहे.
बार्शिटाकळी - परिसरासहसंपूर्ण तालुक्यात तब्बल ६५ मिलिमीटर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे त्यांना दिलासा मिळाला असून, तालुक्यात पेरणीस सुरुवात झाली आहे.

बुधवारी रात्रीच्या सुमारास बार्शिटाकळी शहर परिसरात दमदार पाऊस झाला. या पावसाची नोंद ६५ मिलिमीटर एवढी करण्यात आली. त्यामुळे आता पेरणीस सुरुवात झाली असून, शेतकरी बैलजोडी आधुनिक यंत्रांद्वारे पेरणीच्या कामात गुंतले आहेत.

महिला मजुरांकडून कपाशीची लागवड केली जात आहे. पेरणीसाठी पुरुषांना २०० ते ३०० रुपयांपर्यंत, तर महिला मजुरांना १०० ते १५० रुपयांपर्यंत मजुरी दिली जात आहे. सद्य:स्थितीत उडीद मुगाची पेरणी कमी प्रमाणात दिसत असून, कपाशीची पेरणी अधिक प्रमाणात होत आहे. यासोबतच सोयाबीन, ज्वारी तुरीची पेरणीही केली जात आहे. उशिरा पाऊस सुरू झाल्याने मूग, उडिदाचा पेरा दरवर्षीप्रमाणेच कमी असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

पेरणीच्या दृष्टीने कृषी केंद्रांमध्ये रासायनिक खते, बियाणे, औषधीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. सद्य:स्थितीत मागील दोन वर्षांच्या दुष्काळाचे सावट कायम आहे. मात्र, बुधवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी मोठ्या आशेने पेरणीच्या कामात गुंतले आहेत.
प्रतिनिधी महान
बार्शिटाकळी तालुक्यात महान वगळता परिसरातील लहानमोठ्या गावांमधील शेतकऱ्यांनी जवळपास ९० टक्के पेरणी पूर्ण केली आहे. महान येथे पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली नव्हती. मात्र, बुधवारी झालेल्या दमदार पावसामुळे शुक्रवारपासून पेरणीस सुरुवात झाली आहे. मागील वर्षीचा पावसाचा अंदाज लक्षात घेता या वर्षी शेतकऱ्यांनी कपाशी वगळता सोयाबीन, तूर, ज्वारी, उडीद, मूग पिकास जास्त प्रमाणात पसंती दिली आहे.
मागील वर्षी पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठी लावलेला खर्चही निघाला नव्हता. त्याची भर रब्बी हंगामात भरून काढण्याच्या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी भुईमूग, गांदा, हरभरा पिकाची पेरणी केली होती. मात्र, विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने रब्बीतही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. काही शेतकऱ्यांनी जनावरे विकून तर काहींनी कर्ज काढून पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव केली आहे.
निसर्गापाठोपाठ शासनानेही शेतकऱ्यांना एकप्रकारे फटका दिला आहे. अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी बार्शिटाकळी मूर्तिजापूर तालुक्यातील सोयाबीनला केवळ २४६८ रुपये प्रती हेक्टरप्रमाणे विम्याची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यापैकी कपाशी, मूग, उडीद या पिकांना वगळल्याने अनेक शेतकऱ्यांना ५५ रुपये, १०८ रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे त्यांनी भरलेली विम्याच्या रकमेएवढीही रक्कम मिळाली नाही. अन्य पाच तालुक्यांमध्ये प्रती हेक्टर सोयाबीन पिकाला १० ते १२ हजारांच्या वर विमा जाहीर करण्यात आला आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

शेतकऱ्यांसमोर समस्या
^शेतकऱ्यांना केवळ २४०० रुपये हेक्टरी विमा मिळणार आहे. त्यामुळे पेरणीची व्यवस्था करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. त्यातच पावसाची अनिश्चितता असल्यानेही चिंता वाढली आहे. रमेशदेशमुख, शेतकरी, भेंडीमहाल

बातम्या आणखी आहेत...