आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शिटाकळी येथे राजनखेडच्या शेतमजुराचा बोरमळी शिवारामध्ये खुन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शिटाकळी - बार्शिटाकळी पोलिस स्टेशन अंतर्गत राजनखेड येथील लालसिंग भगा राठोड, वय ५५ वर्षे यांचा मृतदेह बोरमळी येथील शेत शिवारात शेताच्या धुऱ्यावर एक झुडुपात आढळून आला. लालसिंग भगा राठोड बुधवारी सकाळच्या सुमारास पत्नीसह मजुरांना शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी घेऊन गेले होते. काम झाल्यावर पत्नी मजुरांना घरी जाण्यासाठी सांगितले. लालसिंग राठोड हे शेतामध्ये थांबले आणि उशिराने येतो असे सांगितले.

 

मात्र, कुटुंबीयांनी रात्री 8 वाजताच्या सुमारास फोन लावला असता उचलला नसल्याने त्यांचा गावात शोध घेतला. ते आढळून आल्याने त्यांना शोधण्यासाठी शेतात गेले असता धुऱ्यावरील झुडुपामध्ये रात्री दहा वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची फिर्याद किरण लालसिंग राठोडने नोंदवली. लालसिंग राठोड यांच्याकडे दोन एकर जमीन असून, त्यांना तीन मुली, दोन मुले असून, दोन मुलींचे लग्न झाले आहे, एक मुलगा किरण राठोड याचे शिक्षण सुरू असून, दुसरा मुलगा कंपनीमध्ये काम करतो. घटनेचा पुढील तपास पीएसआय खांडवाय करत आहे.

बातम्या आणखी आहेत...