आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी बांधवांनी केला अमृत योजनेला विरोध; शेतकरी संघटनेने दिली वाण प्रकल्प कार्यालयास भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - वाणधरणामधील ४७ टक्के जलसाठा हा राखीव आहे. परंतु, धरणाचा मुख्य उद्देश हा सिंचनाकरिता होताे. धरणात जवळपास १५ टक्के गाळ हा दरवर्षी राहतो. ६३ टक्के उर्वरित जलसाठा हा वाण जलाशयामधील संपूर्ण पाणी आहे, ही माहिती वाण प्रकल्प शाखा अभियंता विजय वैष्णव श्रीकृष्ण खोकले यांनी दिली. शेतकरी संघटनेने वाण प्रकल्प कार्यालयास भेट दिल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली मते मांडली. 
संपूर्ण पाणीसाठा हा अमृत योजनेंतर्गत अकोला येथे नेऊन हे पाणी आरक्षित करण्याच्या मार्गावर आहे. 

परंतु, या भागातील शेतकऱ्यांचा याला विरोध आहे. कारण, शेतीकरिता जवळपास पाट-बंधारे बांधण्यात ७५० हेक्टर जमीन ही शेतकऱ्यांची गेली आहे. या क्षेत्रातील लाभार्थी शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. या प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती ही लेखी स्वरूपात घेतली. वाडी अदमपूर, इसपूर, दहिगाव इतर गावांना पाणी मिळत नाही. पण, हे सर्व गाव लाभार्थी क्षेत्रात येतात. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे यांनी स्पष्ट केले की, अकोला शहराला पाणी कमी पडत असल्यास त्यांनी सर्व प्रथम त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या जलाशय प्रकल्पात पाणी साठवणूक करून तेथील प्रकल्पामधूनच घेण्यात यावे. त्यांना आवश्यक आसलेले पाणी महानगरपालिकेने वॉटर हार्वेस्टिंग करावे. ज्यामुळे पाण्याची समस्या उभी राहाणार नाही. तरी मानवता या नात्याने जर का पाणी पिण्याकरिता आपातकालीन परिस्थितीत नेण्यास विरोध नाही. परंतु, आरक्षित करण्यास विरोध आहे. शेतकरी संघटना तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर यांनी म्हटले की, शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह पुर्णपणे शेतीवर असून, कोरडवाहूमधून बागायतीकडे वळलेले शेतकरी पुन्हा कोरडवाहूकडे वळवणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. शेतकऱ्यांचे शेतीस सिंचनाकरिता उपयोगी असलेले पाणी शासनाला पळवून नेऊ देणार नाही. 

शेतकरी संघटना अकोट, युवा आघाडीचे विक्रांत बोंद्रे यांनी म्हटले की, शेतकऱ्यांसोबत हा अन्याय सतत होत आहे हा आम्ही होऊ देणार नाही. गरज पडल्यास शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी बांधव यांनी आंदोलनास कोणत्याही वेळेस सज्ज रहावे. तसेच वाडी अदमपूर येथील शेतकरी संघटना गाव प्रमुख गोपाल भाकरे यांनी म्हटले की, आमचे उदरनिर्वाहाचे साधन शेती असून, आम्हाला पाण्याशिवाय पर्याय नाही. हा प्रश्न आमचा येणाऱ्या पीढीचा आहे. आतापर्यंत होत असलेल्या अन्यायाला आम्ही सहन करणार नाही. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे, तेल्हारा तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, दहीगाव येथील सरपंच अरुणाताई मोहनराव चंदन, अकोट तालुका युवा आघाडीचे विक्रांत बोंद्रे, वाडी अदमपूर, प्रमुख गोपाल भाकरे, उप प्रमुख सचिन थोटे, मोहन चंदन, योगेश तिवाने, रवींद्र भोराळे, नीतीन वाघ, प्रमोद भोंगळ, सतीश भोंगळ, विष्णू शेळके, दिनेश मोरखडे, संजय देशमुख, अनंता तळोकार, बबलू भाकरे, सतीश भोजने, दिनेश देऊळकार, नीलेश नेमाडे, दिनेश गिऱ्हे, सुरेश सोनोने समस्त शेतकरी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...