Home »Maharashtra »Vidarva »Akola» Farmer Son Died Due To Poisoning

शेत बटईने देऊन विषबाधित मुलावर उपचार, मात्र तरीही वाचवण्यात अपयश

अजय डांगे | Oct 11, 2017, 03:03 AM IST

  • शेत बटईने देऊन विषबाधित मुलावर उपचार, मात्र तरीही वाचवण्यात अपयश
अकाेला - अाठ जणांचे कुटुंब... दाेन एकर शेत... नापिकीमुळे दरवर्षीच अार्थिक संकट... कुटुंब राबल्याशिवाय घरातील चूल पेटत नाही... यातच शेतात कीटकनाशक फवारणी करताना माेठ्या मुलाला विषबाधा झाली...उपचारासाठी पैशांची चणचण भासल्याने पीक उभे असलेले शेत दुसऱ्याला बटईने (लागवडीला) दिले... उपचारांवर दीड लाख रुपये खर्च करूनही मुलगा वाचवता अाला नाही. डाेक्यावर कर्जही झाले...यंदा तर लागवडीसाठी शेतही नाही... फवारणीमुळे मृत्यू अाेढवत असल्याने दुसऱ्याच्या शेतात फवारणीचे काम करणाऱ्या लहान मुलानेही धास्ती घेतली... अाता कुटुंबाचा गाढा कसा हाकावा, घरातील मुलांचे शिक्षण कसे हाेणार, अशा अनेक प्रश्नांचा डाेंगर अागर (जि. अकाेला) येथील मनाेहरराव फुकट यांच्या कुटुंबासमाेर उभा अाहे.
विदर्भात पिकांवरील फवारणीतून विषबाधित शेतकरी-शेतमजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच अाहे. राजेश मनाेहरराव फुकट (४५) यांना फवारणीतून विषबाधा झाल्याने १६ सप्टेंबर राेजी रुग्णालयात दाखल केले हाेते. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने नंतर नागपुरात हलवण्यात अाले. उपचारांसाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च झाले. तरीही १ अाॅक्टाेबर राेजी राजेशची प्राणज्याेत मालवली. फुकट कुटुंबीयांकडे दाेन एकर शेत अाहे. कुटुंबातील सदस्य स्वत:च शेती करून मजुरीही करतात. घरच्या शेतात मशागत ते पीक उभे राहण्यापर्यंत फुकट कुटुंबीयांचे २५ ते ३० हजार रुपये खर्च झाले. यंदा चांगले पीक येईल अशी अाशा हाेती. मात्र माेठा मुलगा राजेश फुकट यांना फवारणीतून विषबाधा झाली. उपचारांसाठी नातेवाईक, परिचितांनी अार्थिक मदत केली. मात्र तरीही पैसे कमी पडल्याने त्यांनी ३० हजार रुपयांमध्ये शेत लागवडीसाठी दिले. कष्टाने उभे केलेले पीक दुसऱ्याच्या हातात देताना फुकट कुटुंबीयांचे डाेळे पाणावले हाेते.
यांना झाली विषबाधा :बळीराम धाेत्रे, विठ्ठल लक्ष्मण काळणे, श्रीकृष्ण अंबादास फुकट यांचा समावेश अाहे. कीटकनाशकात विषाची तीव्रता वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न
राजेश हे प्रचंड कष्टकरी असल्याने त्यांना कामावर बाेलावण्यासाठी गावात जणू स्पर्धाच लागायची, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे अाहे. त्यांच्या पश्चात वडील मनाेहरराव, पत्नी संगीता, भाऊ दिलीप व भावाची पत्नी अनिता यांच्यासह दाेन मुली प्रतिभा व मीनल, मुलगा यश अाहे. प्रतिभा ही इयत्ता ९वी, मीनल इयत्ता ८वीत व मुलगा यश हा इयत्ता ५वीत शिकताे. अाता या मुलांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिला अाहे.

रोजगार बुडाल्याने शहराकडे धाव
अागर गावात फवारणी करणाऱ्या १० युवकांचा गटच अाहे. त्यांना किमान २०० रुपये प्रतिदिन अथवा २० रुपये पंपाप्रमाणे मजुरी दिली जाते. प्रत्येक युवक फवारणीतून दिवसाला सरासरी ४०० रुपयांपर्यंत मजुरी मिळवताे. मात्र अाता फवारणीतून मृत्यूंची मालिकाच सुरू झाल्याने या युवकांनी काम तूर्तास बंद केले अाहे. त्यामुळे राेजगार बुडत अाहे. यापैकी काहींनी राेजगारासाठी शहराकडे धाव घेतली अाहे.

Next Article

Recommended