आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोटच्या गोळ्याला सोबत घेऊन केली पेरणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू - दरवर्षीच्या पावसाच्या लहरीपणामुळे सर्व संकटात सापडले आहेत. पेरणीसाठी पुरेसे भांडवल नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या वर्षी तरी चांगले पीक येईल, या आशेने अनेकांनी पेरणी केली. मात्र, पेरणीसाठी पैसे नसल्याने स्वत:च्या पोटच्या गोळ्याला शेतात आणून दोघा बापलेकांनी पेरणी केली. हे वास्तव दहीगाव गावंडे येथील असून, अरुण ब्रम्हदेव गावंडे असे शेतकऱ्याचे नाव आहे.
तीन वर्षांपासून अल्प पाऊस होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या वर्षी तरी चांगला पाऊस येईल, या आशेने अनेकांनी पैशांची जुळवाजुळव करून पेरणी केली. मात्र, दहीगाव गावंडे येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण ब्रह्मदेव गावंडे यांच्याकडे पेरणीसाठी पैसे नसल्याने त्यांनी स्वत:च्या मुलाला शाळेमध्ये पाठवता आपल्या अडीच एकर शेतात आणले. त्यानंतर दोघा बापलेकांनी शेतात पेरणी आटोपली. दोन मुलांना शाळेची पुस्तके, ड्रेस आणायचे की, पेरणी करायची अशा विवंचनेत गावंडे होते. इयत्ता बारावीला शिकत असलेला मुलगा हृषीकेशला त्यांनी सोबत घेऊन साहायाने पेरणी केली. त्यांचा एक मुलगा अकोला येथे शिकायला होता. मात्र, परिस्थिती बिकट झाल्याने त्यांनी त्याला गावातच बोलावले. त्याच्या पुस्तकासाठीही पैसे नाहीत, तर पेरणी कशी करावी, अशी विवंचना आहे.

एकीकडे शहरात पुस्तकांच्या दुकानावर दररोज गर्दी होत आहे. मात्र, माझ्या मुलाला पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याने त्याला उच्च दर्जाचे शिक्षणही मला देत येत नाही. ही सर्व परिस्थिती नापिकीमुळे ओढवली आहे. यावर्षी पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याने स्वत:च्या खांद्यावर जू घेऊन मुलाला सोबत घेऊन शेतात पेरणी केली.

अन् शेतकऱ्याच्या डोळ्यात आले पाणी
परिस्थिती कथन करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. मुलाला शिकवायची तीव्र इच्छा असूनही त्याच्या शिक्षणासाठीच्या गरजा पूर्ण करू शकत नसल्याची त्यांनी खंतही व्यक्त केली.
पोटच्या गोळ्याला सोबत घेऊन केली पेरणी
च्या डोळ्यात पाणी आले. मुलाला शिकवायची तीव्र इच्छा असूनही त्याच्या शिक्षणासाठीच्या गरजा पूर्ण करू शकत नसल्याची त्यांनी खंतही व्यक्त केली.
च्या डोळ्यात पाणी आले. मुलाला शिकवायची तीव्र इच्छा असूनही त्याच्या शिक्षणासाठीच्या गरजा पूर्ण करू शकत नसल्याची त्यांनी खंतही व्यक्त केली.
पोटच्या गोळ्याला सोबत घेऊन केली पेरणी
दिव्य मराठी विशेष
------------------
बातम्या आणखी आहेत...