आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाभाऊ खोत, राजकुमार बडोले यांची भेट घेऊन शेतकऱ्याने संपवले आयुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राज्याचे मंत्री सदाभाऊ खोत, राजकुमार बडोले यांची भेट घेऊनही प्रश्न न सोडवल्याने कर्जबाजारी शेतकर्‍याने आयुष्‍य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात ही घटना घडली आहे. ज्ञानेश्वर मिसाळ (वय-55, रा. सोयजना) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

 

ज्ञानेश्वर मिसाळ यांच्यावर आयसीआयसीआय बँकेचे 2.5 लाख, महिंद्रा फायनान्सचं 3 लाख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं दीड लाख तर मुथूट फायनान्सचे 1.5 लाखाचे कर्ज होते. या प्रकरणी मिसाळ यांनी गेल्या 27 नोव्हेंबरला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाज कल्याणमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिला होता. मात्र, यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्याने मिसाळ यांनी 6 डिसेंबर रोजी यवतमाळ येथे जाऊन विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.

 

पुढील स्लाइडवर वाचा... काय आहे ज्ञानेश्वर मिसाळ यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात...

बातम्या आणखी आहेत...