आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याअभावी सुकलेली पीके पाहून खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू- कौलखेड जहॉगीर येथील अल्पभुधारक युवा शेतकऱ्याने गावाबाहेरील सोपीनाथ महाराज मंदिरात गळफास लावून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना १८ ऑगस्ट रोजी दुपारी वाजताच्या सुमारास घडली. 

प्रमोद पुंडलीक तायडे, वय ३० वर्षे रा. कौलखेड जहॉगीर असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी यंदा पाण्याअभावी सुकत असलेली पीके पाहून ते चिंतेत होते. तसेच महाराष्ट्र बँक शाखा पळसोचे पीक कर्ज, महेंद्र फायनान्सच्या कर्जाचा डोंगर त्यांच्यासमोर होता. यामुळे चिंतेत असल्याने त्यांनी मंदिरातील घंटीला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. पी. के. काटकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अशोक पितळे तपास करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...