आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगळुद येथील ५३ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहीगाव गावंडे - येथून जवळच असलेल्या सांगळूद येथील ५३ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना जानेवारी रोजी घडली. गजानन गणपतराव मते यांच्याकडे दोन एकर शेती असून, सतत नापिकी होत असल्याने आर्थिक संकटात सापडले हाेते. त्यामुळेच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. घटनेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. घटनेचा पंचनामा जमादार विलास सोळंके, हरीश सातव, मनोहर इंगळे यांनी केला. 
पुढील तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, गजानन गणपतराव मते यांनी एका मायक्रो फायनान्सचे २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सततची नापिकी अाणि कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील काळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, कर्जबाजारीपणामुळेच मते यांनी अात्महत्या केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये हाेती. 

 
बातम्या आणखी आहेत...