आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीमध्ये उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देऊळगावमही- यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरिपाचे, तर अवकाळी पावसासह गारपिटीने रब्बी पिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे डोक्यावरील कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत सापडलेल्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना १२ एप्रिल रोजी सकाळी वाजता सुरा येथे घडली आहे.

सुरा येथील अल्पभूधारक शेतकरी तुकाराम विक्रम चेके वय ५५ यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यांनी शेतीवर बँकेचे कर्ज काढले होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून होत असलेली नापिकी या वर्षी खरीप हंगामात पिकाचे नुकसान झाल्यामुळे डोक्यावरील कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न त्यांना पडला होता. यातून कुठलाच पर्याय सापडल्याने त्यांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी शेतात जातो, असे सांगून ते घरून निघून गेले होते. नातेवाइकांना त्यांचा मृतेदह विहिरीत तरंगताना आढळून आला. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुली एक मुलगा असा आप्तपरिवार आहे. या घटनेची माहिती सरपंच प्रकाश चेके यांनी अंढेरा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

चांडोळ येथे आत्महत्या
चांडोळसततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे चांडोळ येथील लिंबाजी सखाराम सोनुने वय ६५ या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ एप्रिल रोजी पहाटे वाजता घडली. लिंबाजी साेनुने यांच्याकडे आठ एकर कोरडवाहू शेती आहे. नापिकी आणि आर्थिक विंवचनेला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.