खामगाव- सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा डोंगर यासह इतर कारणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या एका ३० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन केल्याने १६ जून रोजी त्याचा मृत्यू झाला.
खामगाव तालुक्यातील कारेगाव हिंगणा येथील शेतकरी मनोज रुंदाजी चव्हाण वय ३० हा शेतात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु नापिकी झाल्यामुळे डोक्यावरील कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्याला सतावत होता. यातून कुठलाच पर्याय सापडल्याने त्याने जून रोजी विष प्राशन केले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला येथील सामान्य रुग्णालयात नंतर पुढील उपचारासाठी लाइफलइन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.
सतत आठ दिवस शेतकऱ्याने मृत्यूशी झुंज दिली. अखेर आज त्याचा मृत्यू झाला. मृतक शेतकऱ्यावर बडोदा बँकेचे कर्ज असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. जिल्ह्यात सततची नापिकी दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला असून, आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत.