आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिक्षेपात शेतकरी आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कधी अतिवृष्टी, तर कधी अपुऱ्या पावसामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. यामुळे खर्च वजा करता बळीराजाच्या हाती काहीही शिल्लक राहत नाही. त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. चालू वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत नऊ महिन्यांत ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर शेतकरी आत्महत्या थांबवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेती डबघाईस आल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील जमिनीच्या ६५ टक्के क्षेत्र हे खारपाणपट्ट्यात असून, साडेपाचशे गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये पाणीसाठा उपलब्ध व्हावा म्हणून अधिकाधिक शेततळे, गावतलाव बंधारे बांधण्यासाठी जिल्हा प्रशासन गेल्या वर्षभरापासून प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. हा बदल चालू वर्षात होताना दिसून येतो. मात्र, आधीच आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गत पाच वर्षांत कोणत्याही ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. शेतकरी आत्महत्या झाली की, तहसीलदारांमार्फत प्रस्ताव येतो. प्रस्तावावर जिल्हास्तरीय समिती निर्णय घेऊन सानुग्रह अनुदान म्हणून लाख रुपये मदत कुटुंबीयांना सुपूर्द केली जाते. त्यामुळे मृत शेतकऱ्याच्या दारी सांत्वनापुरते प्रशासन लोकप्रतिनिधी जातात. मात्र, जिवंत शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात विदर्भासह इतर भागांत अनेक उपाययोजना फेल ठरत असून, शेतकरी आत्महत्यांचे सत्र कायम सुरूच आहे.

जिल्हा प्रशासन पाठीशी
^जिल्ह्यात संरक्षित पाणीसाठा निर्माण होण्यासाठी बंधारे, गावतलाव, शेततळे अधिकाधिक व्हावेत, या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. जलयुक्त शिवार अभियानाला लोकसहभागाची चांगली साथ मिळत आहे. शेतीला मुबलक पाणी मिळाल्यास निश्चित उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी आत्महत्या थांबतील.'' जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी

कुटुंबाने धीर द्यावा
^कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने शेतकऱ्यास धीर देणे गरजेचे आहे. घरातील कर्ता नेहमी उदास राहत असेल, मनाशीच बडबडत असेल, जेवत झोपत नसेल तर अशा परिस्थितीत त्याची अवस्था समजून घ्यावी.'' -डॉ. नवीन तिरुख, मानसोपचारतज्ज्ञ.

अंदाज चुकत आहेत
^कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा अंदाज घेणे जमले नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही कारणे शोधणे गरजेचे अाहे. '' श्रीकृष्णठोंबरे, शेतकरी, कान्हेरी सरप

कुणीही आत्महत्या करू नका
^शेतकरी असो वा सामान्य नागरिक कुणीही आत्महत्येचा मार्ग पत्करू नये. कोणतीही अडचण असो, ती सोडवण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर आहेत. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनात आम्ही लवकरच गावोगावी समुपदेशन उपक्रम राबवणार आहोत. कुणीही अात्महत्येचा विचार करू नये.'' प्रा.संजय खडसे, एसडीओ

शेती मजुरांवर विसंबून
^शेती असूनही प्रत्यक्ष शेतात काम करणारे शेतकरी कमीच आहेत. शेती करण्याची इच्छा असूनही मजूर मिळत नसल्याने शेतीला न्याय मिळू शकत नाही. वेळेवर मशागत कामे होत नसल्याने उत्पन्नावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे.'' प्रमोद खडसे, शेतकरी, घुसर

केवळ चर्चा नको, कृतीची गरज
एका बाजूला शेतकरी पाऊस वेळेवर पडत नसल्याने, घेतलेल्या कर्जाला बँकवाले सावकाराच्या धाकाने स्वत:च्या गळ्याला फास लावून जीवन संपवत आहे. दर आठवड्याला जिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत. "शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या' या विषयावर भाषणबाजी केली जाते. मात्र, प्रत्यक्ष कृतीसाठी कुणी पुढे येताना दिसत नाही.

बैठकीत आत्महत्येचा निकाल
शेतकरी आत्महत्या निवारण नियंत्रण समितीची बैठक दरमहा नियमित घेतली जाते. या बैठकीत केवळ आत्महत्या नियमात बसते की नाही, यादृष्टीने निर्णय दिला जातो. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा सहनिबंधक, पंचायत समिती सभापती, निवासी उपजिल्हाधिकारी यांचा समावेश असतो.

लाख ४२ हजार
लाख ५५ हजार हेक्टर
जानेवारी ते डिसेंबर २०१४
चौकशीत
अपात्र
अपात्र
पात्र
पात्र
जानेवारी ते सप्टेंबर २०१५
बातम्या आणखी आहेत...