आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कुटुंबीयांचे होणार पुनर्वसन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा कुटुंबीयांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना प्रशासनाच्या वतीने सानुग्रह मदतीचे वाटप केले जाते, पण सोबतच अशा कुटुंबीयांचे कायमस्वरुपी पुनर्वसन व्हावे, असा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचा मानस आहे. महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत अशा कुटुंबांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. ही माहिती गोळ झाल्यानंतर गरजेनुसार अशा कुटुंबातील व्यक्तींना कायमस्वरूपी रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

‘त्या’कुटुंबीयांना दिली जाणार आर्थिक मदत : शेतकऱ्यांनीआत्महत्येचे पाऊल उचलू नये, यासाठी प्रमिलाताई ओक सभागृहात सायंकाळी वाजता एका कार्यक्रमाचे अायोजन केले आहे. या वेळी प्रा. सतीश फडके शेतकरी या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमातच जमा झालेली रक्कम जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे शेतकरी मदतनिधी म्हणून सुपूर्द केली जाईल. या रकमेतून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी रोजगाराचे माध्यम उपलब्ध करून दिले जाईल.

दानशूरांनी समोर यावे
बळीराजालामदत करण्यासाठी दानशूर व्यक्ती, गणेश मंडळे, अधिकारी, पदाधिकारी, शैक्षणिक संस्थांचे संचालक, डॉक्टर्स, वकील, बांधकाम व्यावसायिकांनी पुढे येण्याची गरज आहे. अॅड.धनश्री देव अभ्यंकर, नगरसेविका.