आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाख शेतकऱ्यांना मिळणार अन्नसुरक्षेचा लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - शासनानेनुकतीच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयान्वये राज्यातील १४ जिल्ह्यांचा समावेश असून, बुलडाणा जिल्ह्याचाही त्यात समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख दोन हजार ७८१ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना या योजनेनुसार दरमहा प्रती व्यक्ती पाच किलो धान्य देण्यात येणार आहे. गहू दोन रुपये प्रती किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलो दराने राहतील. या योजनेत समावेश होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा चालू वर्षाचा सात बारा उतारा, केशरी शिधापत्रिकेची प्रत दुकानदाराकडे उपलब्ध करुन दिलेले स्वयंघोषणापत्र भरुन देणे आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे ज्या दुकानाची शिधापत्रिका आहे, त्याच स्वस्त धान्य दुकानदाराकडे देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांच्या क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेची माहिती करुन द्यावी लागणार आहे. तसेच आवश्यक कागदपत्रे गोळा करावी लागणार आहेत. त्याची यादी तयार करुन ती तहसीलदारांकडून प्रमाणित करुन घ्यावी लागणार आहे, तसेच त्याची एक प्रत तहसील कार्यालयास उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे.

देऊळगावराजा - ५,६००
मेहकर- १२,१५२
चिखली - १३,५७१
मोताळा - ४,२९८
मलकापूर - ८,२२२
सिंदखेडराजा - १०,८९२
जळगाव - ५,७०२
शेगाव- ५,१९०
खामगाव - ८,६४५
नांदुरा - ४,८४१
लोणार - ७,१९८
बुलडाणा - १०,४९३
संग्रामपूर ५,९७७

तहसीलस्तरावर बनवणार याद्या
शेतकऱ्यांचीयादी तयार करण्यात आली असून, ती पूर्णत्वास गेली नाही. यात फेरबदल होण्याची शक्यता आहे. या योजनेचे काम तहसीलस्तरावरुन केले जाणार आहे. त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांचा निश्चित आकडा प्राप्त होणार आहे. मिस्कीन,जिल्हा पुरवठा अधिकारी

नोकरीवर असणाऱ्यांचा समावेश नाही
यायोजनेपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दुकानदारांनी दक्षता घ्यावी. शासकीय निमशासकीय नोकरीत असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वस्त धान्य दुकानदारांना केले आहे.

पाच लाख किलो लागेल धान्य
जिल्ह्यातशेतकरी अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी संख्या एक लाख दोन हजार ७८१ एवढी आहे. या योजनेतील प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मिळणार आहे. त्यामुळे महिन्याकाठी पाच लाख १३ हजार ९०५ किलो धान्य लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाला या दृष्टीने पुरवठा आणि साठा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...