आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने दडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात, शासनाने मदत करण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली - मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्याचे अखेरचे टोक असलेल्या शेळगाव अाटोळ, अंचरवाडी, डोढ्रा, मिसाळवाडी मंगरूळ शिवारातील सोयाबीन, मूग, उडीद ही पिके करपली आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस आल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. या संकटातून सोडवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे ११ ऑगस्ट रोजी केली.

 
विदर्भातील शेती सिंचना अभावी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे वेळोवेळी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका येथील शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक वेळा शेतीत केलेला खर्चही निघत नसल्याने येथील शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला आहे. परिणामी ९० च्या दशकापासून विदर्भात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. या वर्षी खरिपाच्या पेरणीनंतर दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे श्रावण महिन्यातही नदी, नाले, तलाव अद्यापही कोरडे आहेत. हीच स्थिती कायम राहिल्यास रब्बी हंगामही हातची जाणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. 

भविष्यात पाऊस आला तरी सुद्धा आज रोजी ७० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावरून मदत देण्यात यावी, अशी मागणी बाजार समिती सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, बाजार समिती माजी उपसभापती ओमप्रकाश भुतेकर, डॉ. विकास मिसाळ, सुधाकर देशमुख, संतोष अटोळे, दीपक म्हस्के, शे. जाफर, अवचितराव देशमुख यांनी केली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...