आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एससी, एसटी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी काेटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - अनुसूिचत जाती उपाय याेजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती-नवबाैद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी काेटी रुपये मंजूर करण्यात अाले असून, गुरुवारी मार्गदर्शक तत्वे कृषि विभागाला प्राप्त झाली अाहेत. विशेष घटक याेजनेतअंर्गत १४ बाबींसाठी निधी मंजूर झाला अाहे.
दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या अनूसूचित जाती, नवबैद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना द्रारिद्रय रेषेवर अाणण्यासाठी अर्थसहाय्य याेजना राबवण्यात येते. कृषी विभागातर्फे विशेष घटक याेजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येताे. या याेजनेअंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण अाैजारे, शेतीची सुधािरत अाैजारे, बैलजाेडी, इनवेल बाेअरिंग, जुनी विहिर दुरुस्ती, पाईपलाईन, पंपसेट, ताडपत्री, नवीन विहिर, तुषार ठिबक सिंचन याेजना, शेततळे अादींसाठी अनुदान देण्यात येते. दरम्यान , सन २०१६-१७म‌ध्ये राबविण्यात येणाऱ्या याेजनेसाठी अकाेला जिल्ह्याकरिता काेटी रुपये मंजूर झाले अाहेत.

महिलांनालाभार्थींना प्राधान्य : कृषीिवकासाच्या या याेजनेतअंतर्गत लाभार्थी निवडताना दारिद्रय रेषेखालील लाभार्थी महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना कृषी विभागाने जारी केलेल्या अादेशात दिली अाहे. महिला लाभार्थी उपलब्ध झाल्यास इतर पात्र लाभार्थींची निवड करण्यात येणार अाहे. या याेजनेअंतर्गत घेतलेल्या कार्यक्रमाचा लाभार्थ्यांच्या निवडीची यादी जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी तहसील जिल्हा समाज कल्याण अधिकारी कायार्लयात लावावी लागणार अाहे.

अशीहाेणार निवड : विशेषघटक याेजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात अाला अाहे.
१) शेतकरी अात्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य. २) अपंग लाभार्थी ३) दारित्र्य रेषेखालील महिला त्यानंतर पुरुष ४) एपीएल महिला त्यानंतर पुरुष
असेअाहेत निकष : विशेषघटक याेजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी निकष तयार करण्यात अाले अाहेत.
१) अद्ययावत ७/१२ बंधनकारक राहणार अाहे. २) जातीचा दाखला सादर करणे अावश्यक राहणार अाहे. ३) उत्पन्नाचा दाखल सादर करणे गरजेचे राहणार असून, एससी प्रवर्गासाठी ५० हजार अािण एसटी प्रवर्गातील लाभार्थीसाठी २५ हजाराची अट राहणार अाहे. ४) ते हेक्टर जमीन असलेल्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार अाहे.
लाभार्थींनालाभ घेण्याचे अधिकाऱ्यांचे अावाहन : विशेषघटक याेजनेअंर्तगत पंचायत समितीस्तवरा कृषि अधिकाऱ्यांची(विशेष घटक) नियुक्ती करण्यात अाली अाहे. ्अर्ज पंचायत समित्यांना पाठविण्यात अाले अाहे. लाभार्थ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावे लागणार अाहे. पात्र लाभार्थ्यांनी याेजनाचा लाभ घेण्याचे अावाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार अाणि कृषि विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी केले अाहे.
असे मिळणार अर्थसाहाय्य
१)जमीन सुधारणा (मर्यादा हेक्टर) ४० हजार
२) निविष्ठा हजार
३) पीक संरक्षण, शेतीची सुधािरत अवजारे १० हजार
४) बैलजाेडी/रेडेजाेरी ३० हजार
५) जुनी विहिर दुरुस्ती ३० हजार
६) इनवेल बाेअरिंग २० हजार
७) पाईप लाईन २० हजार
८) नवीन विहिर ७० हजार ते लाख
९) शेततळे ३५ हजार
११) तुषार, ठिबक सिंचन संच २५ हजार
१२) ताडपत्री १० हजार
१)जमीन सुधारणा (मर्यादा हेक्टर) ४० हजार
बातम्या आणखी आहेत...