आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेऊळगावमही- नदी काठावरील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी पोलिसांनी घेवून आज १५ नोव्हेंबर रोजी आले होते. परंतु यावेळी संतप्त झालेल्या चारशे ते पाचशे शेतकऱ्यांनी आक्रमक भुमिका घेवून वीज पुरवठा खंडीत करू देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे वीज कनेक्शन कट करण्यासाठी आलेल्या वीज अधिकाऱ्यांना खाली हात परतावे लागले आहे.
या वर्षी देऊळगावराजा तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खडकपूर्णा प्रकल्पात केवळ अठरा टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेले मंडपगाव, चिंचखेड, खल्याळ गव्हाण, गारगुंडी, टाकरखेड भागिले, सुलतानपूर आदी गावातील शेतकऱ्यांनी दुष्काळजन्य परिस्थिती झगडून रब्बीची पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र संबधित विभागाने काही दिवसांपूर्वी नदी काठच्या गावातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा पात्रातील शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा थांबवावा, अन्यथा वीज पुरवठा खंडित करून कृषी पंप इत्यादी जप्त करण्यात येईल, असा इशारा तसेच पत्र प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. दरम्यान आज बुधवारी रोजी खडकपूर्णाचे प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभाग, महसूल, पोलीस कर्मचारी यांच्यासह वीज कंपनीच्या कर्मचारी नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.