आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान झाले असून, आता रब्बीचेही पीक हातातून जात आहे. कमी पावसामुळे तूर हरभरा या पिकांचे नुकसान होत असल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीन तूर या पिकाची पेरणी केली होती. मात्र, सोयाबीनचे उत्पन्न एकरी एक ते दोन क्विंटल झाले. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्चही या उत्पन्नातून निघाला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले. आता तुरीचेही पीक हातातून जाण्याची चिन्हे आहेत. कमी पावसामुळे तुरीच्या शेंगा लवकर सुकल्या फुलोराही नाहीसा झाला. त्यामुळे तुरीचे पीक घटण्याची शक्यता आहे.

तालुक्यात हरभरा या पिकाचीही पेरणी कमी आहेे. बागायतदार शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी केली खरी मात्र, जमिनीत ओलावा नसल्याने शेतकऱ्यांना पाच ते सहा वेळा पाणी द्यावे लागत अाहे. त्यामुळे विहिरीची पातळी खालावत असून, पाच ते सहा तास चालणारी मोटार आता दोन तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कमी पाण्यात कोणते पीक घ्यावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील काही वर्षांपासून नापिकीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही.

तुरीचे सात बहार
^तूरया पिकाला किमान सात बहार येतात. मात्र, या वर्षी जमिनीत ओलावा कमी असल्याने बहारही कमी झाले. त्यामुळे तुरीचे उत्पादन निम्म्याने घटू शकते. तुरीकडून अपेक्षा होती मात्र येथेही निराशाच पदरी येणार आहे.'' गोवर्धन काकड, शेतकरी,सांगळूद.

वातावरणातील बदल
^तूरया पिकाचा कालावधी हा सात ते आठ महिन्यांचा अाहे. मात्र, तो कालावधी पूर्ण होताच तुरीला शेंगा लागल्या. उष्ण हवामानामुळे जमिनीतील ओल कमी झाली असून, त्याचा फटका तुरीला बसला आहे.'' प्रकाश काळे, शेतकरी,सांगळूद.
बातम्या आणखी आहेत...