आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट, मदतीचा हात मिळणार कधी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू - बोरगावमंजू परिसरातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले असून, हंगामीपाठोपाठ रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. भूगर्भपातळी खोल गेल्याने पिके करपली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सोयाबीननंतर कापूस, तुरीचे उत्पादन घटणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
बोरगावमंजू परिसरात अवेळी अपुरा पाऊस झाल्याने तसेच परतीच्या पावसाने साथ दिल्याने सुरुवातीलाच मूग, उडीद पिके हातची गेली, तर बहुतांश प्रमाणात दुबार पेरणीसुद्धा उलटल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तरीही पैशांची जुळवाजुळव करूनही शेतकऱ्यांच्या हाती मशागतीचा खर्चही आला नाही. हंगामी पिकाबरोबरच रब्बी पिकेही धोक्यात आली आहेत. पिके करपली असून, शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. संपूर्ण जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. काही भागात शेतात काही उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. यावर्षी काही शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सण, उत्सव साजरे केले. सध्या शेतात कशाचेही उत्पन्न येईनासे झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

गावांमध्येपसरले दुष्काळाचे सावट
परिसरात बहुतांश शेती ही कोरडवाहू असून, अल्प प्रमाणात जलसिंचन करून शेती केली जाते. मात्र, विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेली असून, बोअरवेल्सचा उपसा होत आहे. या वर्षी गहू पेरणीचे प्रमाणही घटले आहे. परिसरातील वाशिंबा, डोंगरगाव, वणीरंभापूर, अन्वी, पळसो, सांगळूद, निपाणा, कानशिवणीसह परिसरातील गावांमध्ये दुष्काळाचे सावट पसरले आहे.

पेरणीचा खर्चही निघाला नाही
सोयाबीन प्रती एकर ३० ते ४० किलो झाले. काहींच्या शेतात ५० ते ९० किलो झाले. यामुळे महागडे बी-बियाणे, मशागतीचा खर्चही निघाला नाही. काही प्रमाणात कापूस, तुरीचे पीक हातात येईल, अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र, पाण्याची पातळी खोल गेली आहे.

मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला
^वस्तुस्थितीच्या आधारे जिल्ह्यातील आणेवारी ५० पैशांच्या आतमध्ये घेतली आहे. शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. ज्या प्रमाणात नुकसान झाले त्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.'' प्रा.संजय खडसे, उपविभागीय अधिकारी

शासनाने त्वरित मदतीचा हात द्यावा
^अल्पप्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आमच्या जगण्याचे साधनच हिरावले गेले, तरी मायबाप सरकारने आम्हाला त्वरित मदत देऊन दिलासा द्यावा. मदतीचा हात पुढे करावा.'' आनंदाबागडे, रामजीनगर, बोरगावमंजू

कमी अाणेवारीचा ठराव केला मंजूर
^पावसाअभावीपरिसरात पिकांची हानी झाली. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ग्रामपंचायत प्रशासनाने कमी आणेवारीचा ठराव घेऊन शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी, असा ठराव घेण्यात आला आहे.'' साधनामुरलीधर भटकर, सरपंच, बोरगाव