आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नजरअंदाज पैसेवारी जास्त; शेतकऱ्यांमध्ये पसरली नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाडेगाव - प्रशासनाने जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीबाबत वाडेगावच्या शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाकडून नुकतीच दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, वाडेगावची पैसेवारी ५२ दर्शवल्यामुळे या गावाचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश होऊ शकला नाही. सध्याची स्थिती आणि दर्शवलेल्या पैसेवारीमध्ये मोठी तफावत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा खरीप हंगामात झालेला अत्यल्प प्रमाणातील पाऊस, पेरणीस झालेला विलंब यामुळे उत्पादन घटले. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची अवस्था यापेक्षाही दयनीय झाली असून, बहुतांश शेतकऱ्यांना एकरी एक क्विंटलही सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. पैसेवारी ठरवताना निकष लावून जादा पैसेवारी दाखवली काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पैसेवारी ठरवताना कोणत्या भागाचा सर्व्हे केला याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे. शासनाने आता सुधारित पैसेवारी करताना वस्तुस्थिती अवलोकनाची मागणी होत आहे.

आर्थिक संकट
^यंदा खरीप हगाम हातचा गेला. उत्पादन घटल्याने लागवडीचाही खर्च निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना प्रशासनाने शेतकऱ्यांवर अन्यायच केला.'' सदानंद भुस्कुटे, शेतकरी

आश्चर्याची बाब
^सक्षमलोक प्रतिनिधीचा अभाव असल्यामुळेच शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. दुष्काळग्रस्त स्थिती असतानाही त्या यादीत गावाचा समावेश झाला नाही. याचे आश्चर्य वाटत आहे.'' अरुणहुसे, शेतकरी
मदतीची आवश्यकता

^वाडेगाव येथील स्थिती वेगळीच आहे. यंदा खरीप हंगामात उत्पादन घटल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे या स्थितीतून सावरण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.'' सुखलाल ताले, शेतकरी

शेतकऱ्यांवर अन्याय
^नजरअंदाज पैसेवारी जादा दाखवून येथील शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.'' वाय.एस. पठाण, शेतकरी
बातम्या आणखी आहेत...